मुंबई : एकीकडे ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) आंदोलनाने संपूर्ण देशाला ढवळून काढले असतानाच, झारखंडमधील (Jharkhand) जेपीएससी (JPSC) आणि जेएसएससी (JSSC) परीक्षांबाबतच्या निदर्शनांमुळे राज्यात तीव्र संघर्ष निर्माण झाला आहे. तिथे झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेसची युती सत्तेवर आहे. काल विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनादरम्यान त्यांच्यावर लाठीचार्ज करण्यात आला आणि अश्रूधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. या प्रकरणावर भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
या घटनेमुळे भाजपने (BJP) आक्रमक पवित्रा घेतला असून, दिल्लीपासून झारखंडपर्यंत निषेध व्यक्त केला जात आहे. संसद परिसरापासून ते थेट झारखंडपर्यंत या हल्ल्याविरोधात मोठ्या प्रमाणावर निदर्शने होत आहेत. आज इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला. तसेच, त्यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे (Udhhav Thackeray) यांच्यावरही टीका केली.
Ashish Shelar attacks Congress and Thackeray leaders
सध्या संसदेचे अधिवेशन सुरू असून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा संसदेत उपस्थित राहणार आहेत. आशिष शेलार यांनी राहुल गांधींवर टीका करताना त्यांना आवाहन केले की, चर्चेदरम्यान त्यांनी पळून जाऊ नये आणि सत्य ऐकण्याची तयारी ठेवावी.
आशिष शेलार यांनी नमूद केले की, “रांचीमध्ये विद्यार्थी भरती प्रक्रियेत पारदर्शकतेची मागणी करत शांततापूर्ण आंदोलन करत होते, तरीही त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. विद्यार्थ्यांना एखाद्या शत्रूसारखी मारहाण करण्यात आली. हे अत्यंत अमानवीय आणि क्रूर आहे.”
“सरकार कुणाचे आहे तर काँग्रेसचे सरकार आहे. या आंदोलनात बळाचा वापर का केला. राहुल गांधी हे तुमचे सरकार आहे. महिलांवर हल्ला करण्याचे आदेश कुणी दिले?” असा सवाल शेलार यांनी विचारला.
.
ठाकरे बंधू गप्प का?
या विद्यार्थ्यांनी कोणतीही अपमानास्पद भाषा वापरली नव्हती, तरीही त्यांना मारहाण झाली. यावर राहुल गांधी काय भूमिका घेणार? राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची वाचा का बसली आहे? ‘मातोश्री’ आणि ‘शिवतीर्थ’चे दरवाजे का बंद आहेत? असे सवाल करत आशिष शेलार यांनी त्यांना टोमणा मारला.
“उद्धव ठाकरे यांना आम्ही रांचीचे तिकीट पाठवून देऊ. उद्धव ठाकरे तुम्ही रांचीला जायला का तयार नाहीत. ते जर रांचीला जायला तयार असतील तर आम्ही तिकीट देऊ. सीजेपीला मालकाने आदेश दिल्यावर बोलतात” असे शेलार म्हणाले.
सोरेन आणि काँग्रेस यावर काय भूमिका घेणार?
झारखंड सरकारने विद्यार्थ्यांशी शत्रूसारखी वागणूक दिली असून त्यांच्यावर क्रूरपणे दडपशाही केली आहे. तारांचे कुंपण, लाठीचार्ज, महिलांवरील हल्ले आणि पोलिसांकडून होणारी मारहाण हे अत्यंत क्रूर, अमानवीय, वेदनादायी आणि संतापजनक आहे.
झारखंडमध्ये काँग्रेस आणि सोरेन यांचे सरकार आहे. या आंदोलनात बळाचा वापर का करण्यात आला? पोलिसांना हे आदेश कोणी दिले, हे आपण विचारायला नको का? हे आदेश कोणी काढले? राजीनामा कुणाचा घेणार? हे राहुल गांधींनी स्पष्ट केले पाहिजे.
विद्यार्थी केवळ आपल्या मागण्या मांडत आहेत. या विद्यार्थी आंदोलनाबाबत हेमंत सोरेन आणि काँग्रेस काय भूमिका घेणार आहेत? भाजप संयमी भूमिका घेत असून विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा देत आहे, असे आशिष शेलार यांनी सांगितले.
राहुल गांधींवर टीका
राहुल गांधीला पार्लमेंटमध्ये फक्त हंगामा करायचे आहे, अशी टीका आमदार संजय उपाध्याय यांनी केली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात चांगले काम करत आहे. काल अमित शहाजीने एक एक प्रश्नाच्या उत्तर दिलेला आहे. प्रत्येक वेळी देशाची जे समस्या आहे त्याच्याबद्दल चिंतन करून संघ परिवार पुढची दिशा ठरवतात.
अभिजीत दिपकेची भूमिका दुटप्पी आहे. केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन झालं त्याच्यामध्ये शिक्षा मंत्री यांनी राजीनामा दिला. पण झारखंड मध्ये जेव्हा आंदोलन सुरू आहे तिथे दिपके आणि त्यांचे सहयोगी आंदोलन करायला गेले नाही. फक्त मीडियामध्ये राहण्याकरता दिपके भाष्य करत आहे, असे उपाध्याय यांनी आरोप केला.
मोदींविरुद्ध आंदोलन करावे
या सर्व प्रकरणावर काँग्रेस नेते नाना पटोले यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. राहुल गांधींनी या घटनेचा निषेध केला असून दोषींवर कारवाईची मागणी केली आहे. जंतरमंतरवरील लाठीचार्जबाबत उत्तर देण्यासाठी नरेंद्र मोदी पुढे आले नाहीत. उत्तर देणे हे त्यांचे कर्तव्य होते आणि त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. भाजप नेत्यांनी नरेंद्र मोदींविरुद्ध आंदोलन करावे, अशी मागणी काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केली आहे.
दरम्यान, ज्या लोकांनी इतके वर्षे लोकांनी विरोध केले ते लोक आता तिरंगा रॅली काढत आहे, अशी टीकाही नाना पटोले यांनी केली.
📌 महत्वाच्या बातम्या
- नवी मुंबईत ‘क्लस्टर’वरून राजकीय रणकंदन; भाजप म्हणाले, ‘एक वीटही रचू देणार नाही’
- मुंबईत राजकीय सस्पेन्स वाढला; ‘हा’ सदस्य अजून ठाकरे गटातच… मग शिंदे गटाच्या बैठकीत कसा?
- मोदी, शाह, सोनिया, राहुल एकाच मंचावर! रेवती सुळेच्या रिसेप्शनने वेधलं देशाचं लक्ष
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












