Share

IMD Weather Alert: राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढणार; पुढील ५ दिवस तुमच्या जिल्ह्यात काय होणार?

हवामान विभागाने राज्यातील अनेक जिल्ह्यांत पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला असून पुणे, सातारा, कोल्हापूरसह विदर्भात अलर्ट जारी केला आहे.

Published On: 

Maharashtra Weather Alert - Heavy rain expected in Maharashtra for next 5 days IMD alert.

गेल्या काही दिवसांपासून दडी मारून बसलेला पाऊस आता पुन्हा एकदा रौद्र रूप धारण करणार का? मुंबईसह राज्याच्या (Maharashtra Weather) अनेक भागात सध्या पावसाचा लपंडाव सुरू असला, तरी पुढील पाच दिवस राज्यासाठी अत्यंत धोक्याचे आणि महत्त्वाचे ठरणार आहेत.

कारण, मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राने (IMD Rain Alert) दिलेल्या ताज्या माहितीनुसार, राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार आहे. काही जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस तर काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह तुफान पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Maharashtra Weather Forecast

अधिकृत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, १ ऑगस्ट २०२६ रोजी पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. याच दिवशी ठाणे, रायगड, रत्नागिरीसह संपूर्ण विदर्भात (अकोला, नागपूर, अमरावती, यवतमाळ) यलो अलर्ट देण्यात आला आहे.

दुसरीकडे, २ ते ३ ऑगस्ट दरम्यान कोकण आणि विदर्भात पावसाचा जोर कायम राहणार आहे. रायगड, रत्नागिरी आणि चंद्रपूर-गडचिरोली पट्ट्यात मेघगर्जनेसह जोरदार सरी कोसळतील असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

तसेच, ४ आणि ५ ऑगस्ट रोजी विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांना यलो अलर्ट कायम ठेवण्यात आला आहे. नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.

या बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. विशेषतः सखल भाग, नदी-नाल्यांचा परिसर आणि घाट रस्त्यांवरून प्रवास करताना विशेष काळजी घ्यावी. तसेच आपत्कालीन परिस्थितीत थेट स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधावा, असं स्पष्ट आवाहन करण्यात आलं आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही