पुणे : पुणे महानगरपालिकेतील काँग्रेस पक्षाचे माजी शहराध्यक्ष अरविंद तुकाराम शिंदे (Arvind Shinde) यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक डॉ. मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांना थेट पत्र लिहून भाजप प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत आणि महापालिकेतील भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित केला आहे. ‘देवभाऊंचा निरोप आहे’ (Devabhauncha Nirop) या नावाखाली आर्थिक अनियमितता, निविदांमधील (टेंडर) घोटाळे आणि नियमांचे उल्लंघन केले जात असल्याचा खळबळजनक आरोप या पत्रात करण्यात आला आहे.
पत्रात नेमके काय म्हटले आहे?
१६७ कोटी रुपयांचा निविदा घोटाळा
घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या निविदा क्रमांक ३/२०२६-२७ अंतर्गत, आमदार योगेश टिळेकर (Yogesh Tilekar) यांचा पाठिंबा असलेल्या ‘भूमीश्री’ कंपनीला १६७ कोटी रुपयांचे कंत्राट देण्यासाठी नियम बदलण्यात आल्याचा थेट आरोप पत्रात करण्यात आला आहे. या प्रकल्पाचा मूळ अंदाजित खर्च ४०० कोटी रुपये असताना, निविदेचे मूल्य १६७ कोटी रुपये (आणि यापूर्वी ७०० कोटी रुपयांपर्यंत) वाढवण्याचे प्रयत्न झाले, ज्यामुळे सरकारी तिजोरीवर ५६७ कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडला, असे यात नमूद केले आहे.
“देवभाऊंचा निरोप आहे”: भ्रष्टाचारासाठी ‘कोडवर्ड’
शहरातील प्रत्येक निर्णयामध्ये ‘देवभाऊंचा निरोप’ असल्याचे कारण पुढे करून आर्थिक अनियमितता केली जात आहे. रस्ते कामे, नदी सुधारणा, २४x७ पाणीपुरवठा योजना आणि कचरा व्यवस्थापन उपक्रम यांसारख्या प्रकल्पांवर कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी केल्याबद्दल पत्रात टीका करण्यात आली आहे. तसेच ही घोषणा भ्रष्टाचारासाठी एक ‘राजमार्ग’ बनली असल्याचे म्हटले आहे.
भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे जे अनेकदा आपल्या आरएसएस (RSS) पार्श्वभूमीचा उल्लेख करतात, त्यांना परिस्थितीची जाणीव असूनही या विषयावर मौन बाळगून आहेत. तसेच, महापौर मंजूषा नागपुरे, स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले आणि सभागृह नेते गणेश बिडकर यांच्या भूमिकेवरही या पत्राद्वारे प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. पुण्याच्या स्थानिक राजकारणात दुय्यम स्थान मिळाल्यामुळे आणि या भ्रष्टाचाराकडे ‘गांधारीप्रमाणे’च दुर्लक्ष केल्यामुळे, या पत्रात केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांच्यावर टीका करण्यात आली आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- “बॉलिवूडमध्ये कुठे-कुठे तोंड काळं केलंय….”; कंगना रणौतची राखी सावंतने थेट लायकी काढली! नेमकं काय घडलं?
- NEET पेपरफुटी आंदोलनातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! फडणवीसांचा गुन्हे मागे घेण्याचा आदेश
- कंगना रणौत यांचा तरुणाईवर संताप! जेन झी आंदोलकांना थेट म्हणाल्या ‘गटर जनरेशन’, नेमकं काय घडलं?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












