Share

शिर्डीत उद्धव ठाकरेंचे सत्ताबदलाचे संकेत; “अडीच-तीन वर्षांत आपलं सरकार येईल”

शिर्डीतील सभेत उद्धव ठाकरे यांनी सत्ताबदलाचे संकेत देत “साईबाबांच्या मनात असेल तर तीन वर्षांत आपलं सरकार येईल” असा विश्वास व्यक्त केला.

Published On: 

Uddhav Thackeray

शिर्डी : शिवसेना (Shivsena) ठाकरे गटातील खासदारांच्या फुटीनंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी बंडखोर खासदारांच्या मतदारसंघांमध्ये दौरे सुरू केले आहेत. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आज शिर्डी (Shirdi) दौऱ्यावर होते. शिर्डीतील सभेत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधत आगामी काळातील राजकीय बदलांचे संकेत दिले.

शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या बंडानंतर उद्धव ठाकरे यांनी शिर्डीत निष्ठावंत शिवसैनिकांचा मेळावा घेतला. यावेळी त्यांनी राज्यातील राजकीय घडामोडींवर भाष्य करत कार्यकर्त्यांना संघर्षासाठी तयार राहण्याचे आवाहन केले.

“आपला दिवस नक्की उगवेल”

सभेत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, राज्यात खासदार फुटत आहेत, तरुणांच्या भविष्याशी संबंधित प्रश्न निर्माण होत आहेत, मात्र जनतेच्या संतापाचा आवाज अजूनही फुटत नाही आहे. हा संताप जागा करण्यासाठी आपण जनतेच्या दारात आलो आहे. आज जे संकटाच्या काळातही माझ्यासोबत खंबीरपणे उभे आहेत, त्या प्रत्येक शिवसैनिकाचा मला सार्थ अभिमान आहे. यालाच खरी निष्ठा, श्रद्धा आणि सबुरी म्हणतात. आयुष्यभर शेळी म्हणून जगण्यापेक्षा एक दिवस वाघासारखे जगा,” असा संदेश देत त्यांनी कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढवला.

“अडीच-तीन वर्षांत आपलं सरकार येईल”

शिर्डीच्या सभेत उद्धव ठाकरे यांनी भविष्यातील राजकीय समीकरणांबाबत भाष्य केले. काही नेते पक्ष सोडून सत्ताधारी गोटात गेले असले तरी परिस्थिती बदलेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. “साईबाबांच्या मनात असेल तर येत्या अडीच-तीन वर्षांत आपलं सरकार येईल,” असे म्हणत त्यांनी सत्ताबदलाचे संकेत दिले.

भाजपवर साधला निशाणा

यावेळी उद्धव ठाकरे यांनी केंद्रातील भाजप सरकारवरही टीका केली. शिवसेना, तृणमूल काँग्रेस आणि आम आदमी पक्षातील फुटीचा उल्लेख करत त्यांनी सत्तेचा गैरवापर होत असल्याचा आरोप केला. त्यांनी ‘महिला आरक्षण विधेयक’ आणले असून महिला आरक्षणाच्या नावाखाली देशाचे विभाजन करण्याचा जो सुप्त डाव आखला गेला होता, तो आम्ही हाणून पाडला. जर हे विधेयक सध्याच्या स्वरूपात मंजूर झाले, तर देशाचे संपूर्ण राजकीय नेतृत्व उत्तर भारताकडे जाईल आणि महाराष्ट्रासारख्या राज्यांवर अन्याय होईल, असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले.

शिवरायांचा दाखला देत कार्यकर्त्यांना आवाहन

आपल्या भाषणात उद्धव ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या संघर्षाचा दाखला दिला. तुळजाभवानीने जेव्हा शिवरायांना तलवार दिली, तेव्हा त्यांनी केवळ मूठभर मावळ्यांच्या बळावर बलाढ्य साम्राज्यांविरुद्ध लढा दिला. हाच इतिहास आणि हाच संघर्ष आपल्याला शिवरायांनी शिकवला आहे. त्याचप्रमाणे संकटाच्या काळात निष्ठा कायम ठेवण्याचे आवाहन त्यांनी शिवसैनिकांना केले.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही