मुंबई : बॉलिवूड अभिनेता आमिर खान (Aamir Khan) सध्या त्याच्या खासगी आयुष्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. दोन घटस्फोटानंतर आता तो तिसऱ्यांदा लग्नबंधनात अडकणार असल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आमिर खान आणि गौरी स्प्रॅट (Gauri Spratt) यांचं लग्न 5 जुलै रोजी अत्यंत साधेपणाने पार पडणार आहे. या लग्नाबाबत आमिरने सांगितलं की, हा सोहळा मोठ्या थाटामाटात नाही तर घरगुती पद्धतीने होणार आहे. या लग्नात फक्त कुटुंबीय आणि जवळचे मित्र उपस्थित राहणार आहेत.
सध्या आमिर अमेरिकेत असल्यामुळे भारतात परतल्यानंतर लग्न पार पडणार असल्याचंही त्याने स्पष्ट केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या लग्नाच्या चर्चांना जोर आला आहे. आता या बातमीला दुजोरा मिळाल्याने चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.
आमिर खानने याआधी 2025 मध्ये गौरीसोबतच्या नात्याची कबुली दिली होती. आता 61 व्या वर्षी तो तिसऱ्यांदा नव्या आयुष्याची सुरुवात करणार आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- संचिता उगलेच्या मृत्यूवर रवी किशन यांची मोठी प्रतिक्रिया, म्हणाले ‘असं केल्याने आत्म्याला…’
- समंथाने घेतली मुख्यमंत्री विजय यांची भेट, अभिनेत्याचं यश पाहून म्हणाली ‘त्यासाठी मोठी हिंमत लागते…..’
- ‘देऊळ बंद २’साठी शाहरुख खान आला मदतीला धावून, अभिनेत्याने नेमकं केलं तरी काय?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












