Share

मुंबईत अवजड वाहतूकदारांचा बेमुदत संप; शालेय बसेस, कंटेनर वाहतूक ठप्प, वारकरीही अडचणीत

Mumbai heavy vehicle strike. School buses, container transport to stop.

Published On: 

Mumbai heavy vehicle strike from tomorrow. School buses, container transport to stop.

🕒 1 min read

मुंबई: मुंबई आणि महाराष्ट्रातील अवजड वाहतूक चालक-मालक संघटनांनी मध्यरात्रीपासून बेमुदत संपाची हाक दिली आहे. यामुळे मुंबईतील सुमारे ३० हजार शालेय बसेस आणि जेएनपीटी येथील ३८ हजार कंटेनर वाहतूकदार संपात सहभागी होणार आहेत. या संपामुळे शालेय विद्यार्थी आणि आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे निघालेल्या वारकऱ्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

एलपीजी वाहक, अत्यावश्यक सेवा देणारे ट्रक, पाणी वाहक टँकर अशा सर्वच अवजड वाहतूक करणाऱ्या चालक आणि मालकांनी एकजुटीने संपाचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये ई-चलन कारवाई तात्काळ थांबवावी, आधी केलेल्या दंडाच्या कारवाईतून सूट मिळावी आणि क्लिनर अनिवार्य असल्याचा निर्णय मागे घ्यावा यांचा समावेश आहे.

Mumbai heavy vehicle strike

ऑल इंडिया ट्रान्सपोर्ट काँग्रेस नवी दिल्ली, बस अँड कार कॉन्फिडरेशन नवी दिल्ली, महाराष्ट्र राज्य ट्रक टेम्पो टँकर बस वाहतूक महासंघ, स्कूलबस संघटना महाराष्ट्र राज्य, इंटरस्टेट कंटेनर असोसिएशन महाराष्ट्र, एलपीजी वाहतूक संघटना महाराष्ट्र राज्य यांसारख्या प्रमुख संघटनांनी या संपाला पाठिंबा दर्शवला आहे. यामुळे हा संप राज्यव्यापी स्वरूप धारण करण्याची शक्यता आहे.

सध्या शाळा सुरू झाल्या असून, विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसाठी स्कूल बसेस महत्त्वाच्या आहेत. याचवेळी आषाढी वारी जवळ आल्याने वारकरी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करत आहेत. अशा महत्त्वाच्या वेळीच अवजड वाहने आणि खासगी बसचालकांनी संपाचे हत्यार उपसल्याने विद्यार्थी आणि वारकरी दोघांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

या संदर्भात काही दिवसांपूर्वी मंत्रालयात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत बैठक झाली होती, मात्र ती निष्फळ ठरली. कोणताही तोडगा न निघाल्याने अखेर संघटनांनी ‘चक्का जाम’ आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता सरकार यावर काय तोडगा काढते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!