🕒 1 min read
मुंबई : महाराष्ट्रात यंदा मान्सूनने (Maharashtra Rain) मे महिन्यातच दमदार हजेरी लावली होती. मात्र सध्या राज्यात पावसाची गती मंदावली असून, हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील १२ जूनपर्यंत पावसाने विश्रांती घेण्याची शक्यता आहे.
कोकण, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात सुरुवातीला चांगला पाऊस झाला होता. मात्र गेल्या चार दिवसांपासून अनेक भागांत पावसाने खंड घेतला आहे. मुंबई, पुणे आणि कोकणात पावसाची चिन्हं नाहीत, त्यामुळे उष्णतेत वाढ झाली आहे.
Maharashtra Rain: Rain will take a break in the state
हवामान विभागाने विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला असून, यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. इतर भागांमध्ये तुरळक किंवा हलक्या सरींची शक्यता आहे.
शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा सल्ला:
कृषी विभागाने शेतकऱ्यांना सध्या पेरणी न करण्याचा सल्ला दिला आहे. कारण मान्सूनची गती मंदावल्यामुळे पुढील काही दिवसात पुरेसा पाऊस होण्याची शक्यता कमी आहे. १२ जूननंतर पावसाचा जोर पुन्हा वाढू शकतो, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- PBKS vs MI : अहमदाबादमध्ये पावसाचं संकट! पंजाब विरुद्ध मुंबई सामना पावसामुळे रद्द होणार?
- एकाच झटक्यात राष्ट्रवादी फुटली! 7 आमदारांनी सोडली अजितदादांची साथ
- शरद पवारांचा मोठा खुलासा! अजित पवारांसोबत एकत्र येणार का? अखेर उत्तर दिलं
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












