Share

“हे तर औरंगजेबापेक्षाही भयंकर…”; भैय्याजी जोशींच्या ‘त्या’ वक्तव्याचा Sanjay Raut यांनी घेतला समाचार

Sanjay Raut has strongly criticized the state government and the BJP over Bhaiyaji Joshi statement in Mumbai yesterday.

by MHD

Published On: 

Sanjay Raut slam Bhaiyyaji Joshi over statement on marathi language

🕒 1 min read

Sanjay Raut । काल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते भैय्याजी जोशी (Bhaiyyaji Joshi) मुंबईत आले होते तेव्हा त्यांनी एक वक्तव्य केले. त्यावरून राजकीय वर्तुळात वाद निर्माण झाला आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

“भैय्याजी जोशी यांनी मुंबईत मराठी शिकणे गरजेची नाही या वक्तव्याचा निषेध केला पाहिजे. माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे वारसदार म्हणवणारे सत्तेत बसलेले मिधें कुठे आहेत ते? त्यांनी हिम्मत असेल या वक्तव्याचा निषेध करावा,” असे आव्हान संजय राऊत यांनी दिले आहे.

“महाराष्ट्र विधानसभेत सरकारने निंदा ठराव आणून धिक्कार करावा. नाही तर तुम्ही मराठी आईच दूध प्याले नाहीत. तुमच्या दूधात भेसळ आहे. असेच वक्तव्य इतर राज्यात करण्याची हिंमत भैय्याजी जोशी यांच्यात आहे का?” असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.

“जोशींच्या या वक्तव्याने संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील 106 हुताम्यांचा अपमान झाला असून भाजप नेते असे बोलून मराठीचा मराठी माणसाचा अपमान करत नाही का? जर तसे नसेल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) जाहीर करावे. हे औरंगजेबापेक्षा भयंकर कृत्य आहे,” असे राऊत म्हणाले.

Sanjay Raut criticize BJP over Bhaiyyaji Joshi statement

“कालचं भैयाजीचं वक्तव्य ऐकूण आमचं रक्त खवळलं असून कोरटकर आणि सोलापूरकरसारखे भाजप (BJP) भैयाजी यांना सोडणार आहे. हे कौरव आहेत,” असा घणाघाती आरोप देखील राऊतांनी केला आहे. दरम्यान, राऊतांच्या या आरोपावर राज्य सरकार काय प्रतिक्रिया देते? हे पाहणे महत्त्वाचे ठरते.

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही