Share

“Ajit Pawar यांच्यावर अन्याय झालाय, त्यांना मुख्यमंत्री करायचंय”

At present, discussions have started in the political circle about the Chief Ministership of Ajit Pawar. Now it becomes important to see how the BJP and the Shinde group react to this.

by MHD

Published On: 

Dilip Mohite Patil says Ajit Pawar should become CM

Ajit Pawar । उपमुख्यमंत्री अजित पवार हे सतत कोणत्या ना कोणत्या कारणावरून चर्चेत येत असतात. सध्याही ते एका वेगळ्याच कारणावरून चर्चेत आले आहेत. अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदावरून सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या आहेत.

अजित पवार यांना मुख्यमंत्री करण्यासाठी आता माजी आमदाराने शड्डू ठोकला आहे. महत्त्वाचे म्हणजे अजित पवार यांना मुख्यमंत्री करण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागा, असेही आवाहन त्यांनी केले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.

“राज्यात सर्वात जास्त अन्याय हा अजित पवार यांच्यावर झाला आहे. त्यांनी पुण्यासह बारामतीला न्याय दिला आहे. संधी मिळून देखील त्यांना मुख्यमंत्री केलं नाही. ते जर राज्याचे मुख्यमंत्री असते तर आत्तापर्यंत राज्याचा चेहरा मोहरा बदलला असता. त्यामुळे अजित पवारांना मुख्यमंत्री करण्यासाठी कामाला लागा,” असे आवाहन माजी आमदार दिलीप मोहिते पाटील (Dilip Mohite Patil) यांनी केले आहे.

Dilip Mohite Patil on Ajit Pawar

महत्त्वाची बाब म्हणजे दिलीप मोहिते पाटील यांनी हे आवाहन अजित पवारांच्या समोरच उपस्थितीत कार्यकर्त्यांना केले आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. यावर आता भाजप (BJP) आणि शिंदे गट काय प्रतिक्रिया देते हे पाहणे महत्त्वाचे ठरते.

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही