🕒 1 min read
Jitendra Awhad । सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्या प्रकरणी अटकेत असलेल्या वाल्मिक कराड (Walmik Karad) चे पोट दुखायला लागल्याने त्याला बीडच्या जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. अजूनही त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाली नसून त्याच्यावर सेमी आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत. यावरून आमदार जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली आहे.
“वाल्मिक कराडला अटक केली पण आता ICU मध्ये झोपला आहे. आता कराडला मोठे मोठे आजार होतील. वाल्मिक कराडला पहिले हॉस्पिटलमधून बाहेर काढा. त्याला मोकळं सोडून द्या, त्याचा फैसला जनता घेईन. सर्व पुरावे असूनही पोलीस अटक करत नाही. चार्जशीटमध्ये नाव का नाही,” असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच वाल्मिक कराडने खंडणी मागितली त्या दिवशीचे CCTV फुटेज समोर आले होते. अशातच आता पुन्हा एकदा एक नवीन CCTV फुटेज समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. हे फुटेज वाल्मिक कराड याचा सहकारी आणि माजी सरपंच बालाजी तांदळे (Balaji Tandle) याचे आहे.
Jitendra Awhad target Walmik Karad
सुदर्शन घुले, विष्णू चाटे, जयराम चाटे आणि महेश केदार यांना गेवराईच्या पोलीस कोठडीत ठेवले होते त्यादरम्यान त्यांना लागणारे साहित्य बालाजी तांदळेने एका दुकानातून खरेदी केले असल्याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- धक्कादायक! Balaji Tandle ने पुरवले पोलीस कोठडीतील आरोपींना साहित्य? समोर आले नवे CCTV फुटेज
- “मुख्यमंत्री मराठ्यांशी बेइमानी, गद्दारी करणार…”; Manoj Jarange Patil यांचा मोठा दावा
- “भाजप Walmik Karad ला संत पदाचा दर्जा देऊन…”; Sanjay Raut यांची जोरदार टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












