Share

ST STAND – ट्रीपल इंजिन सरकारच्या दिरंगाईने पुणेकर त्रस्त; चार वर्ष झाले शहराला बस स्थानक मिळेना

ST STAND SHIVAJINAGAR | pune city have no st stand | मेट्रोस्थानक बांधण्याच्या कारणास्तव शिवाजीनगर बस स्टॅन्ड पाडण्यात आले आणि तात्पुरते स्टॅन्ड जुन्या पुणे मुंबई हायवे वर हलवण्यात आले. आता त्याला आता साडेतीन वर्षे झाली आहेत. | Mukund Kirdat

Published On: 

ST STAND SHIVAJINAGAR – मेट्रोस्थानक बांधण्याच्या कारणास्तव शिवाजीनगर बस स्टॅन्ड पाडण्यात आले आणि तात्पुरते स्टॅन्ड जुन्या पुणे मुंबई हायवे वर हलवण्यात आले. आता त्याला आता साडेतीन वर्षे झाली आहेत. परंतु नवीन स्थानक बांधणी संदर्भात अजूनही स्पष्टता असणारे करार व वेळापत्रक ठरलेले नाही असा दावा आप चे मुकुंद किर्दत ( Mukund Kirdat ) यांनी केला आहे.

शिवाजीनगर येथे महा मेट्रो आणि एस टी महामंडळ यांच्यातील कराराला तब्बल चार वर्षे होऊन गेले आहेत. 22 नोव्हेंबर 2023 रोजी आम आदमी पार्टी ने याबाबतीत पत्र व्यवहार करून बांधकाम वेळापत्रक जाहीर न केल्यास आंदोलनाचा इशारा दिला होता.

आता लवकरच एसटी महामंडळाच्या स्थापत्य विभागाच्या विद्या बिलारकर नकाशे सादर करणार असल्याचे सांगत आहेत परंतु याबाबतीत महा मेट्रो कडून अजूनही कुठल्याही पद्धतीचे लेखी स्वरूपामध्ये करार झालेले नाहीत. 15 ऑक्टोबर 2019 च्या कराराप्रमाणे शिवाजीनगर स्थानकाचे एकूण जागेपैकी तीनहजार चारशे स्क्वेअर मीटर एवढी जागा महा मेट्रो यांच्याकडे ताब्यात देणे व या ताबेदारीचा रेट हा 2019 मधील ( 21 कोटी पेक्षा अधिक) शासकीय दराप्रमाणे असेल.

या करारात एमएसआरटीसी आणि प्रवाश्यांच्या हिताच्या बाबीचा अभाव आहे. किमान शिवाजीनगर बस स्थानक महामेट्रोकडून बांधून घेणे अपेक्षित आहे.

चार वर्ष रखडवलेल्या शिवाजीनगर बस स्थानकाच्या दिरंगाईला जबाबदार कोण?

याबाबतीत करारामध्ये स्पष्टता आणली गेली नसल्याने यामध्ये पीपीपी/ कमर्शियल तत्त्वावरती एसटी स्थानक बांधून त्याच्यामध्ये आर्थिक हितसंबंध निर्माण करण्याचे काही जणांचे धोरण असल्याचे कळते. या प्रकल्पात दिरंगाई झाली असल्याने प्रत्यक्षामध्ये गेल्या पाच वर्षांमध्ये जनतेचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यांना मनस्ताप होतो आहे.

तसेच वाहतूक कोंडी रिक्षा चालकांची अरेरावी आधी प्रश्नांना सामोरे जावे लागत आहे. आम आदमी पार्टीचे मुकुंद किर्दत ( Mukund Kirdat ) व शंकर थोरात यांनी महामित्र कडून कराराची प्रत मिळवून त्या संदर्भात पुण्यातील एसटी महामंडळाचे अधिकारी काळभोर तसेच डेप्युटी जनरल मॅनेजर विद्या भिलारकर यांच्याशी संपर्क केला होता.

मोठया आर्थिक नुकसानीला जबाबदार कोण?

महा मेट्रो या बाबतीत अनभिज्ञ असून त्यांच्या बाजूने अजूनही स्पष्टता नाही. आता या स्थानकासाठी वाढीव खर्च येणार असून त्याचा बोजा कोणी सोसायचा यावरती अजूनही निर्णय झालेले नाही. एसटी महामंडळाने मेट्रोला दिलेल्या जमिनीच्या बदल्यात बांधकाम खर्च वळता करण्याचे ठरलेले आहे.

परंतु प्रत्यक्षात बसस्थानक बांधकाम पाडल्यामुळे आणि नवीन बांधकामासाठी लागणारी निधी विषयी स्पष्टता नसल्याने अजूनही हा प्रकल्प कागदावरील उतरलेला नाही. त्यामुळे ट्रिपल इंजिन सरकारचे पुण्यातील सर्वच स्थानीक आमदार गेली पाच वर्षे काय करत होते हा प्रश्न आहे असा सवाल आप चे मुकुंद किर्दत ( Mukund Kirdat ) यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही