Share

Vijay Wadettiwar | भाजपच्या तिकिटावर अजित पवारांना निवडणूक लढावी लागणार – विजय वडेट्टीवार

Vijay Wadettiwar | मुंबई: अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलेल्या बंडखोरीनंतर राज्यातील राजकीय घडामोडींनी वेग धरला आहे. अशात अजित पवार नुकतेच अमित शाह (Amit Shah) यांना भेटून आले आहे. अजित पवार अमित शाहांकडे शिंदे गटाची तक्रार करण्यासाठी गेले असल्याची चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर विधानसभा विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) … Read more

Published On: 

Vijay Wadettiwar | मुंबई: अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलेल्या बंडखोरीनंतर राज्यातील राजकीय घडामोडींनी वेग धरला आहे. अशात अजित पवार नुकतेच अमित शाह (Amit Shah) यांना भेटून आले आहे.

अजित पवार अमित शाहांकडे शिंदे गटाची तक्रार करण्यासाठी गेले असल्याची चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर विधानसभा विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी अजित पवार यांच्यावर शाब्दिक हल्लाबोल चढवला आहे.

भाजपच्या तिकिटावर अजित पवारांना निवडणूक लढावी लागणार, असं विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी म्हटलं आहे.

Ajit Pawar must have cried now – Vijay Wadettiwar

प्रसार माध्यमांशी बातचीत करत असताना विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) म्हणाले, “अजित पवारांना आगामी निवडणुका भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर लढाव्या लागेल, असं मला (Vijay Wadettiwar) वाटत आहे.

कमळावर निवडणूक लढवण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नाही, हे मी (Vijay Wadettiwar)  ठामपणे सांगत आहे. दिल्ली पुढे झुकलेले आता आपली दादागिरी दाखवू शकत नाही.

अजित पवारांवर आता रडण्याची परिस्थिती निर्माण झालेली असेल. कारण आपल्यासोबत आलेल्यांना भारतीय जनता पक्ष खूप रडवतो. आता अजित पवारांवर रडण्याची वेळ आली असावी.

दरम्यान, ठाकरे गटाने आजच्या सामना अग्रलेखाच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर टीका केली आहे. ‘एकच प्याला ‘नाटकातील ‘आर्य मदिरा मंडळा’त होणारे नाटक आज महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू आहे. मुख्यमंत्री शिंदे हे सध्या अल्लाबक्षच्या भूमिकेत वावरत आहेत व ते भाजपच्या ढोंगी हिंदुत्वाचा प्रचार करीत आहेत.

सत्य पायदळी तुडवून त्यांनी ‘खोटे’ छातीशी धरले आहे. शिंदे कधी एखाद्या तीर्थस्थानी असतात तर अनेकदा दिल्लीचरणी. आता ते मन रमविण्यासाठी स्वतःला भाजपच्या प्रचारात गुंतवून घेत आहेत.

नकली आणि डुप्लिकेट शिवसेनेच्या प्रचारात राम उरला नाही हे त्यांना वर्षभरात समजले हे बरे झाले. महाराष्ट्राचे ‘अल्लाबक्ष’ भाजपच्या प्रचारास निघाले आहेत. त्यांची ‘आखरी मंजिल’ तीच आहे, असं आजच्या सामना अग्रलेखात म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही