Share

Sanjay Shirsat | “राणा दाम्पत्य फडणवीसांचे भक्त, त्यामुळे त्यांना…”; नवनीत राणांच्या ‘त्या’ वक्तव्यावर संजय शिरसाटांचा टोला

Sanjay Shirsat | मुंबई : राज्यात विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांतील पाच जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. त्यासाठी सर्वच पक्षाकडून जोरदार तयारी सुरु झाली आहे. यासाठी अमरावती पदवीधर मतदार संघातून भाजपने डॉ. रणजीत पाटील यांना उमेदवारी दिली आहे. याच पार्श्वभूमीवर अमरावतीमध्ये आयोजित प्रचारसभेत बोलताना खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक … Read more

Published On: 

Sanjay Shirsat | मुंबई : राज्यात विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांतील पाच जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. त्यासाठी सर्वच पक्षाकडून जोरदार तयारी सुरु झाली आहे. यासाठी अमरावती पदवीधर मतदार संघातून भाजपने डॉ. रणजीत पाटील यांना उमेदवारी दिली आहे. याच पार्श्वभूमीवर अमरावतीमध्ये आयोजित प्रचारसभेत बोलताना खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक करत मोठं विधान केलं.

‘देवेंद्र फडणवीस हेच आमच्या मनातील मुख्यमंत्री आहेत’, असं खासदार नवनीत राणा म्हणाल्या. दरम्यान, नवनीत राणांच्या या विधानावर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “राणा दाम्पत्य हे देवेंद्र फडणवीसांचे भक्त आहेत. एखाद्याचं भक्त असणं काही चुकीचं नाही. त्यामुळे त्यांना फडणवीस मुख्यमंत्री आहेत, हे वाटणं साहाजिक आहे. यामागे त्यांची भावना चांगली आहे.”

“मी एकनाथ शिंदेंना मानतो, मग मी पण म्हणेल की एकनाथ शिंदे २५ वर्ष मुख्यमंत्री राहायला हवे. त्यामुळे नवनीत राणा यांनी त्यांचं मत व्यक्त केले आहे आणि यात काहीही चुकीचं नाही”, अशी प्रतिक्रिया संजय शिरसाट यांनी दिली आहे. तसेच राणा दाम्पत्याची इच्छा असेल तर फडणवीस मुख्यमंत्रीही होतीलही, असं खोचक टोलाही त्यांनी यावेळी बोलताना नवनीत राणा यांना लगावला आहे.

काय म्हणाल्या होत्या नवनीत राणा?

त्या म्हणाल्या, “पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीत आणि आमचे देवेंद्र फडणवीस या राज्यामध्ये. राज्यातून गोवा, गोव्यातून गुजरात. जिथं जिथं देवेंद्र फडणवीस यांचं पाऊल पडलं, तिथ तिथं न्यायासाठी लढणारा व्यक्ती देवेंद्र फडणवीस आहेत. त्यांच्या पाठीशी आपण उभे राहिले पाहिजे. त्यांच्या कामाची स्टाईल धडाकेबाज आहे.” पुढे त्या म्हणाल्या, “त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा डंका महाराष्ट्रात तर वाजतोच आहे, पण इतर राज्यातही त्यांच्या कामाची चर्चा होते. सर्वांना आपण उपमुख्यमंत्री वाटता. पण, आमची सर्वांची इच्छा आहे की आमचे मुख्यमंत्री आपणच आहात. आमच्या मनात आपण मुख्यमंत्री आहात. यात काही शंका नाही.”

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही