Ayodhya Ram Mandir | प्राणप्रतिष्ठे दिवशी शाळा-कॅालेज बंद राहणार; सरकारचा मोठा निर्णय

Schools And Colleges Closed on Ayodhya Ram Mandir Ceremony

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ayodhya Ram Mandir | उत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराची उभारणी होत असून 22 जानेवारीला मंदिराची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. अयोध्येत रामललाच्या मूर्तीला अभिषेक घातला जाईल.

येत्या 22 जानेवारीला राम मंदिराचं उद्‌घाटन सोहळा होणार आहे.  या कार्यक्रमाचं जगभरातील दिग्गजांना कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यात आलं आहे.

अयोध्येतील राम मंदिराचे बांधकाम अर्धवट आहे ते पूर्ण होण्यास आणखी तीन वर्षे लागणार आहेत परंतु निवडणुकीच्या तोंडावर राजकीय फायदा उठवण्यासाठी अर्धवट बांधकाम असलेल्या मंदिरात प्राणप्रतिष्ठा करण्याची घाई भाजपाला झाली असल्याचा आरोप विरोधक करत आहेत.

दरम्यान, छत्तीसगड सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे, राम मंदिर उद्घाटनाच्या ( Ayodhya Ram Mandir Ceremony  ) दिवशी छत्तीसगडमधील सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद राहणार आहेत.

Schools And Colleges Closed on Ayodhya Ram Mandir Ceremony

अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा दिवशी खासगी, सरकारी शाळा, महाविद्यालयांसह सर्व शैक्षणिक संस्थांना सरकारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. छत्तीसगडचे शिक्षणमंत्री बृजमोहन अग्रवाल यांनी ही घोषणा केली.

अयोध्येत राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा ( Ayodhya Ram Mandir Ceremony  ) २२ जानेवारी रोजी होत आहे. या सोहळ्याची जय्यत तयारी सुरु आहे. यावेळी चार शंकराचार्यांनी या सोहळ्यास विरोध केला आहे. हे शंकाराचार्य या सोहळ्यास येणार नाहीत. मंदिराचे काम अपूर्ण असताना सोहळा होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

जगन्नाथ पुरीतील गोवर्धन पीठाचे जगद्गुरु शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती, उत्तराम्नाय ज्योतिष्पीठचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती, स्वामी अविमुक्तेश्वरानंद आणि स्वामी निश्चलानंद सरस्वती यांनी अयोध्येतील सोहळ्यास जाणार नसल्याचे स्पष्ट केले.

अयोध्येत चारही शंकराचार्य प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास येणार नाही ( Ayodhya Ram Mandir Ceremony )

मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले नाही. मंदिर पूर्ण होण्यापूर्वी प्राणप्रतिष्ठा करणे योग्य नाही. हा विधी शास्त्रोक्त नाही. ज्या ठिकाणी शास्त्रीय विधीचे पालन होत नसेल त्या ठिकाणी आम्ही जाणार नाहीत.

समारंभात फक्त टाळी वाजवण्यासाठी आम्ही का जावे? हा समारंभ राजकीय आहे. सरकारने याचे राजकीयकरण केले असल्याचे स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या