Share

“अनितिमान, असंस्कारी, कारस्थानी चेहरा म्हणजे फडणवीस”, संजय राऊतांची जहरी टीका

The leader of the group Sanjay Raut has strongly criticized the Devendra Fadnavis. Raut has made a venomous criticism that Fadnavis is an unrighteous, unscrupulous, scheming face. He has criticized this while talking to the media.

Published On: 

Sanjay Raut On Devendra Fadnavis । विधानसभा निवडणुकीच्या पार्शवभूमीवर राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. विरोधक सत्ताधारी पक्षातील नेत्यांवर टीका करत आहेत. सध्या देखील ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)  यांच्यावर जोरदार टीका केली आहे. अनीतिमान, असंस्कारी, कारस्थानी चेहरा म्हणजे फडणवीस अशी जहरी टीका राऊतांनी केली आहे. नागपूरमध्ये फडणवीसांचा पराभव होणार असल्याचे देखील राऊत म्हणाले आहेत.

विधानसभा निवडणुकीसाठी शिंदे गटाचं ताई, माई, अक्का… असं मिशन असणार आहे. शिंदे गटाच्या मिशनवर ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे.

राऊत म्हणाले, ‘‘शिंदे गट आईच्या पाठीत खंजीर खुपसून राजकारण करत आहे. तर शिंदे गटाला खंजीर पुरवण्याचं काम अमित शाह, देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. म्हणून महाराष्ट्र त्यांना शत्रू मानतं’, असं संजय राऊत म्हणाले.

पुढे बोलताना संजय राऊत यांनी शिंदे गटावर हल्लाबोल केला. ते म्हणाले, ”माझं तोंड घराब आहे असं म्हणतात लोकं… ताई, माई, अक्का… माझा पक्ष छक्का, असं बोललं तर काय होईल? पण मी असं बोलणार नाही. असं बोललो तर त्यांचा अपमान होईल.” असंही संजय राऊत म्हणाले.

संसद गळतीप्रकरणावरुन देखील संजय राऊत यांनी हल्लाबोल केला आहे. मोदी आणि शाह यांच्या ठेकेदारांनी सेंट्रल व्हिस्ता वास्तू बनवली आहे, ती खचत आहे. यामध्ये किती कमीशनबाजी झालीय हे सर्व दिसतंय. संसदेची ऐतिहासिक इमारत उभी असताना तिथं पाणी भरलं आहे. अयोध्येत देखील राम मंदिराला गळती लागली त्यामुळे ठेकेदाराच्या माध्यमातून निवडणुकीसाठी पैसे घ्यायचे हा भाजपचा उद्योग असल्याचे संजय राऊत म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही