Share

महाराष्ट्र दलालीच्या दलदलीत अडकला; शिवरायांच्या कामात दलाली खाण्याचे कृत्य

Rohit Pawar VS Eknath Shinde And Ajit Pawar | टेंडरबाज, दलालीखोर सरकारचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कामातही दलाली खाण्याचे कृत्य म्हणजे निचपणाचा कळस आहे. प्रत्येक कामाच्या अंदाजपत्रकात १० % वाढ

Published On: 

Rohit Pawar VS Eknath Shinde And Ajit Pawar

🕒 1 min read

Rohit Pawar | मालवणमधील राजकोट किल्यावरील शिवरायांचा पुतळा अवघ्या 8 महिने 22 दिवसांत कोसळला. यामुळे शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत. तर या मुद्द्यावरुन रोहित पवार यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. राज्यात टेंडरबाज, दलालीखोर सरकार असल्याचे म्हणत, सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांच्या कामातही दलाली खाण्याचे कृत्य केल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

Rohit Pawar यांची x वरील पोस्ट- 

टेंडरबाज, दलालीखोर सरकारचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कामातही दलाली खाण्याचे कृत्य म्हणजे निचपणाचा कळस आहे. प्रत्येक कामाच्या अंदाजपत्रकात १० % वाढ आणि नंतर वाढीव दराने टेंडर भरून २५ % वाढ करायची नंतर कंत्राटदाराकडून दलाली खायची असा नवा गोरखधंदा या सरकारने सुरु केला असून ५०००० कोटीची दलालीची प्रकरणे मी स्वतः बाहेर काढली आहेत.

एकीकडं कामांची बिले निघत नाहीत म्हणून विकासकामे थांबली आहेत, तर दुसरीकडं तिजोरी खाली असल्याने अनेक योजनांना तसेच भरती प्रक्रियांनाही स्थगिती देण्यात आलीय. महाराष्ट्र दलालीच्या दलदलीत अडकला असून राज्य आर्थिक दिवाळखोरीच्या मार्गावर येऊन ठेपलंय. या दलालीच्या दलदलीला घाबरून गुंतवणूकदारांनीही राज्याकडं पाठ फिरवलीय.

महाराष्ट्राची अधोगतीकडे होत असलेली वाटचाल रोखणं गरजेचं असून त्यासाठी राज्याच्या आर्थिक स्थितीवर प्रकाश टाकण्यासाठी सरकारने त्वरित दोन दिवसीय अधिवेशन बोलवून चर्चा करायला हवी, अन्यथा दिवाळखोरीच्या गर्तेत अडकत चाललेला महाराष्ट्र बाहेर काढणं खूप कठीण होऊन बसेल.

Rohit Pawar VS Eknath Shinde And Ajit Pawar

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!