Manoj Jarange | देवेंद्र फडणवीसांची लोकं मराठा आंदोलनाला गालबोट लावण्याचा प्रयत्न करताय – मनोज जरांगे

बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
.

Manoj Jarange | छत्रपती संभाजीनगर: गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये मराठा समाज आरक्षण (Maratha reservation) मिळवण्यासाठी आंदोलन करत आहे.

उपोषणकर्ते मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांचं हे आंदोलन सुरू आहे. मराठा समाजाचं हे आंदोलन हिंसक वळण घेताना दिसलं होतं. राज्यामध्ये जागोजागी जाळपोळ, दगडफेक, घरफोडी इत्यादी घटना घडताना दिसल्या होत्या.

याच पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह संपूर्ण सत्ताधारी पक्षावर खोचक शब्द टीका केली आहे. सत्ताधारी पक्षाचे लोक मराठा आंदोलनाला गालबोट लावण्याचा प्रयत्न करत असल्याचं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे.

The Maratha community is peacefully protesting in the state – Manoj Jarange

आज सकाळी प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना मनोज जरांगे (Manoj Jarange) म्हणाले, “मराठ्यांना आणखीन एकजूट होण्याची गरज आहे. परंतु, मराठ्यांनी शांततेत एकत्र यावं.

राज्यातील सर्व मराठा नेत्यांना माझी विनंती आहे की, आमच्या विरोधात जाणून बुजून षडयंत्र रचलं जात आहे, असं दिसत आहे. कारण राज्यांमध्ये मराठा समाज शांततेत आंदोलन करत आहे, असं असून देखील मराठ्यांच्या मुलांना खोट्या केसेसमध्ये गुंतवलं जात आहे.

या गोष्टीकडे मराठा नेत्यांना लक्ष देण्याची गरज आहे. तुम्ही जर या मराठ्यांच्या मुलांची मदत केली नाही तर तुम्हाला ते कधीच माफ करणार नाही.

सत्ताधारी पक्षाचे लोक आमच्या मराठा आंदोलनाला गालबोट लावण्याचा प्रयत्न करत आहे. ही गोष्ट आता तंतोतंत खरी होताना दिसत आहे.

मराठा समाजाला जाळपोळ, दगडफेक याच्याशी काही घेणं-देणं नाही आणि आम्हाला हे करायचं देखील नाही. राज्यात मराठा समाजाचं शांततेत आंदोलन सुरू आहे.”

दरम्यान, जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी मराठा समाजाला आरक्षण (Maratha reservation) मिळावं, यासाठी उपोषण सुरू केलं होतं.

तब्बल नऊ दिवस आमरण उपोषण केल्यानंतर त्यांनी राज्य शासनाने केलेल्या विनंतीवरून आपलं उपोषण मागे घेतलं. त्यानंतर राज्य शासनाने मनोज जरांगे यांना आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी 2 जानेवारीपर्यंत मुदत मागितली होती.

मात्र, जरांगे यांनी राज्य सरकारला 2 जानेवारीपर्यंत मुदत न देता 24 डिसेंबर पर्यंत मुदत दिली आहे. राज्य सरकार 24 डिसेंबर पर्यंत मराठ्यांना न्याय देईल, असा विश्वास मनोज जरांगे यांनी व्यक्त केला आहे.

महत्वाच्या बातम्या

 बातम्यांसाठी Follow आणि Subscribe करा
Google News Follow
YouTube Subscribe