🕒 1 min read
क्रिकेट प्रतिनिधी | IPL 2025 च्या 61व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सचा (LSG) सामना सनरायझर्स हैदराबादशी (SRH) झाला. लखनऊच्या एकाना स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात मालिकधारक संजीव गोएंका यांचा संताप साऱ्यांचे लक्ष वेधून गेला.
LSG कडून कॅप्टन रिशभ पंत पुन्हा एकदा अपयशी ठरला. त्याने अवघ्या 6 चेंडूत केवळ 7 धावा केल्या आणि श्रीलंकन गोलंदाज ईशान माळिंगा कडून एका साध्या झेलवर बाद झाला. हे पाहून संजीव गोएंका स्टेडियमच्या बाल्कनीतून थेट वातानुकूलित बॉक्समध्ये गेले. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
Rishabh Pant Fails Again, Sanjiv Goenka Walks Out in Anger
पंतला मागच्या वर्षीच्या मेगा लिलावात LSG ने 27 कोटी रुपयांना विकत घेतले होते. पण यंदाच्या हंगामात त्याची कामगिरी अत्यंत निराशाजनक ठरली आहे. त्याने आतापर्यंत 12 सामन्यांत फक्त 135 धावा केल्या असून सरासरी 12.27 आणि स्ट्राइक रेट 100 इतकाच आहे.
या सामन्यात LSG ने प्रथम फलंदाजी करत 205/7 धावा केल्या. मिचेल मार्श (65) आणि एडन मार्कराम (61) यांनी दमदार सुरुवात दिली होती. मात्र शेवटच्या षटकांत SRH ने दमदार पुनरागमन करत मोठं स्कोअर रोखलं. SRH कडून माळिंगा 2/28 या सर्वोत्तम आकड्यांसह चमकला.
Rishabh Pant taking revenge of KL Rahul from Sanjiv Goenka 🤣 #RishabhPant #LSGvSRH #SanjivGoenka pic.twitter.com/qTFLbk1ysm
— Kevin (कैवीन) 𝕏 (@kevinshah1307) May 19, 2025
📌 महत्वाच्या बातम्या
- Pant पुन्हा फ्लॉप! चाहत्यांनी सोशल मीडियावर उडवली खिल्ली – बघा मजेशीर मीम्स!
- CSK vs RR : सामना दिल्लीतील हवामान आणि खेळपट्टी अहवाल
- CSK vs RR सामना: चेन्नईच्या संभाव्य Playing 11 ची घोषणा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now