Maruti Brezza Discount : भारतीय ऑटो बाजारात मारुती सुझुकीची कॉम्पॅक्ट एसयूव्ही कार Maruti Brezza धुमाकूळ घालत असून आतापर्यंत या कारने विक्रीचे अनेक विक्रम मोडले आहे. उत्तम फीचर्स आणि बेस्ट मायलेजमुळे Maruti Brezza खरेदीसाठी लोकांनी गर्दी दिसून येत आहे. यातच जर तुम्ही देखील Maruti Brezza खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. होय, सध्या या कारवर बेस्ट डिस्काउंट ऑफर मिळत आहे. ज्याच्या फायदा घेत तुम्ही कमी किमतीमध्ये बेस्ट कार खरेदी करू शकतात.
कंपनीने नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्यात या कारवर 40,000 रुपयांपर्यंत सूट दिली आहे. कंपनी या ऑफरमध्ये ग्राहकांना रोख ऑफर आणि एक्सचेंज ऑफर देणार आहे. या ऑफरचा फायदा फक्त 31 जानेवारीपर्यंतच उपलब्ध असेल. ब्रेझाची एक्स-शोरूम किंमत 8.34 लाख रुपयांपासून सुरू होते. इंजिन आणि पॉवर मारुती ब्रेझामध्ये कंपनीने 1.5-लिटर पेट्रोल इंजिन दिले आहे जे 103bhp आणि 137Nm टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 5-स्पीड मॅन्युअल आणि 6-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक गिअरबॉक्सने सुसज्ज आहे. ब्रेझा प्रति लिटर 20.15 किमी (मॅन्युअल गिअरबॉक्स) आणि 19.80 किमी (ऑटोमॅटिक गिअरबॉक्स) पर्यंत मायलेज देते. त्यामुळेच डिसेंबर 2024 मध्ये भारतीय बाजारात सर्वाधिक विक्री होणारी कार मारुती ब्रेझा आहे.
तर दुसरीकडे भारतीय बाजारात मारुती सुझुकी ब्रेझाला महिंद्रा XUV 3XO टक्कर देत आहे. या कारमध्ये 1.2L टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन आहे. यात 364 लिटरची बूट स्पेस देण्यात आले आहे. सुरक्षिततेसाठी, त्यात लेव्हल 2 एडीएएस, 360-डिग्री व्ह्यू, ब्लाइंड व्ह्यू मिरर, इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक आणि ऑटो होल्ड सारखी फीचर्स आहेत.
महत्वाच्या बातम्या :
- Mahakumbh 2025 : कोण आहेत नागा साधू? शाही स्नानापूर्वी करतात ‘हे’ 17 अलंकार, जाणून घ्या सर्वकाही…
- Mercedes Electric G Class Launched : दमदार फीचर्स अन् 473 किमी रेंजसह बाजारात आली मर्सिडीज इलेक्ट्रिक जी क्लास, किंमत फक्त…
- Mahindra XUV 3XO EV ‘या’ दिवशी होणार लाँच, क्लास फीचर्ससह Punch EV ला देणार टक्कर