Ayodhya Ram Mandir । नव्याने बांधलेल्या रामजन्मभूमी मंदिरातील प्रभू राम लल्लाच्या मूर्तीची ‘प्राणप्रतिष्ठा’ सोहळा सोमवारी 22 जानेवारी रोजी अयोध्या मंदिरात होणार आहे.
प्रभू रामाच्या मूर्तीचा अभिषेक सोहळा सोमवारी दुपारी 12.20 वाजता सुरु होणार असून दुपारी 1 वाजेपर्यंत चालणार आहे. सोहळ्याच्या एक आठवडा आधीच (सोमवारी, 16 जानेवारी रोजी ) विधी सुरू झाले होते.
श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी सांगितले की, राम मंदिर 23 जानेवारीपासून जनतेला दर्शनासाठी खुले केले जाईल. राम मंदिर ट्रस्टने लोकांना या सोहळ्यात सहभागी होण्यास सांगितले आहे.
अयोध्येत उद्या राम मंदिराचा उद्घाटन सोहळा ( Ram Temple Inauguration ) पार पडणार आहे. यासाठी संपूर्ण अयोध्या नगरी सजली आहे. देशविदेशातील भाविकही या सोहळ्यासाठी अयोध्येत दाखल झाले आहेत.
Ayodhya Ram Mandir Inauguration Live Streaming
भव्य राम मंदिर कार्यक्रमाचे लाईव्ह कव्हरेज उद्या सकाळी ७ वाजता सुरू होईल. संपूर्ण सोहळ्याचे थेट प्रक्षेपण ( Live pran pratishtha ceremony ) दूरदर्शनच्या डीडी न्यूज आणि डीडी नॅशनल चॅनेलवर केले जाईल
WHEN AND WHERE TO WATCH Ayodhya Ram Temple Inauguration
तसेच दूरदर्शन नॅशनलच्या यूट्यूब चॅनेलवर तुम्ही Live Streaming पाहू शकाल, अयोध्येत 40 ठिकाणी कॅमेरे बसवले आहेत. लाइव्ह कव्हरेज 4K डिस्प्लेवर उपलब्ध असेल.
महत्वाच्या बातम्या