Manoj Jarange | मनोज जरांगेंना माध्यमातून ‘गायब’ करा; सरकारी दरबारी हालचाली वाढल्या

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Manoj Jarange | मनोज जरांगे मराठ्यांना आरक्षण मिळावे यासाठी पायी मुंबई कडे निघाले आहेत. मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळावे आणि त्यांच्या सोयऱ्यांनाही हे कुणबी प्रमाणपत्र ग्राह्य धरावे या प्रमुख मागण्या घेऊन जरांगे मुंबईला निघाले आहेत. आता रस्त्यातच रोखण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.

मनोज जरांगे ( Manoj Jarange ) यांच्या आरक्षणाच्या मागणीमुळे सरकार अडचणीत सापडले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समोर शपथ घेऊन मराठ्यांना आरक्षण देणार असल्याची ग्यावी दिली होती.

परंतु, सरकार मधील मंत्री छगन भुजबळ यांनी मराठ्यांना OBC प्रमाणपत्र वाटण्यास विरोध केल्याने स्वतःच्या सरकार मधील मंत्र्यामुळे एकनाथ शिंदे अडचणीत सापडले आहे.

तिकडे दोन्ही उपमुख्यमंत्री पवार – फडणवीस यांनी बघ्याची भूमिका घेतली आहे. मराठ्यांना विरोध केला तर आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पक्षाला त्याचा फटका बसेल या कारणाने ते यावर भूमिका घेताना दिसत नाही.

मागील महिनाभरापासून ४० लाखाच्या वर कुणबी नोंदी सापडल्याचे सरकार सांगत आहे. ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांना त्वरित कुणबी प्रमाणपत्राचे वाटप केले जाईल, असेही सांगण्यात आलेले आहे. मात्र प्रत्याक्षात हजारांचा आकडाही पार न केल्याचा संशय व्यक्त होत आहे.

हे वास्तव थेट मराठा आंदोलक जरांगे यांनी पत्रकार परिषदेत विशद केले. या प्रकाराबद्दल जरांगे यांनी सरकारच्या भूमिकेबद्दल कडाडून टीका केली. जरांगे यांच्या रोषानंतर  शासनाकडून तातडीने २ दिवसामध्ये प्रमाणपत्र देण्याची घोषणा झाली.

मात्र, २ दिवसामध्ये ५० लाखाहून अधिक सापडलेल्या कुणबी नोंदीचे प्रमाणपत्र ( Kunbi Certificate ) देणे ही  अशक्य बाब वाटते आहे. कारण जे प्रमाणपत्र ४५ दिवसात वाटप होऊ शकले नाही, ती प्रमाणपत्रे २ दिवसात कशी वाटप करणार?

२२ डिसेंबर २०२३ नंतर ५ मिनिटही सरकारला वेळ देणार नाही, असे म्हणणारे जरांगे ( Manoj Jarange ) यांनी सरकारला २० जानेवारी २०२४ पर्यंत वेळ वाढवून दिला होता. सरकार मधील मंत्री आणि खासगी उपरा सचिव यांना जरांगे आणि मराठ्यांना अंधारात ठेवण्यात यश आले होते.

खासगी उपऱ्या सचिवाने मराठा आंदोलन आणि जरांगे पाटील यांना आपणच हॅडल करत असल्याच्या बढाया मारणे सुरु केल्याचे बोलले जात होते. तसा मेसेज, माहीती फिरवत मुख्यमंत्र्यांची शाबासकी, पाठीवर थाप मारुन घेण्यासाठी हा खासगी सचिव प्रयत्नशील असल्याचे वरिष्ठ पातळीवरील सुत्रांकडुन समजते.

टीका झाल्यानंतर खासगी सचिव सारवासारव करत आहे. आपण मराठा आरक्षणासाठी प्रामाणिक प्रयत्न करत असलाचे सांगत आहे. परतूं, आपल्या मीडियात बातम्या छापून याव्यात त्याने प्रसिद्धी मिळवून राजकिय कारकिर्द सुरु करण्याचे मनसुबे या उपऱ्या सचिवाचे आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

Manoj Jarange disappear from the news; Government Pressure increased On Media

या सर्व प्रकाराबाबत ‘महाराष्ट्र देशा’ने प्रकाश टाकताच सरकारच्या गोडी गुलाबीला भुललेले जरांगे ( Manoj Jarange ) यांनी उपऱ्या सचिव आणि मंत्र्यांना आता चांगलेच धारेवर धरले आहे. आता त्यांच्यावर विश्वास न ठेवत आता जरांगे पायी मुंबईला निघाले आहेत.

यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सरकार मधील मंत्री अलर्ट मोड वर आले आहे. मुबंईत जरांगे आले तर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल म्हणून पोलीस यंत्रणा ही कामाला लागली आहे.

CM Eknath Shinde Appeal To Manoj Jarange, Stop The Agitation 

जरांगे पाटील यांनी आंदोलन थांबवले पाहिजे. आंदोलनाचा जनतेला त्रास होत आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याचे काम अनेक पातळ्यांवर एकाच वेळी सुरु आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

२२ जानेवारी २०२४ रोजी राम मंदिर प्राणप्रतिष्ठा होत आहे. त्या निमित्तानं सर्व देश त्याच्या तयारीला लागला आहे. परंतु महाराष्ट्रात मराठा आंदोलनाने वेगळे चित्र पाहायला मिळत आहे.

मनोज जरांगे (Manoj Jarange) मुंबईत आले तर जागतिक पातळीवर याची चर्चा होणार आहे. त्यातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जागतिक स्तरावर फटका बसु शकतो. यासाठी सर्व माध्यमातून जरांगेंच्या बातम्या न दाखवण्यासाठी दबाव येत आहे.

मनोज जरांगे यांना माध्यमातून कसे गायब करता येईल. मुंबईत येण्यापासून कसे रोखता येईल यावर सरकारी दरबारी हालचाली वाढल्या आहेत. सोशल मीडियावर सरकार लक्ष देत आहे. मनोज जरांगे आणि मराठा आरक्षणासंदर्भातील बातम्यांना कसे रोखता येईल यावर सरकार कामाला लागले आहे.

मराठा आरक्षणाचा मुद्दा भरकटवण्यासाठी सरकार अनेक कुरापतीसाठी शक्कल लढवत आहे. राजकीय नेत्यांकडून जरांगे (Manoj Jarange) यांना सबुरीचे सल्ले देण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र, आरक्षणासाठी हे महत्वाचे शेवटचे आंदोलन असल्याचे जरांगे यांनी मराठा समाजाला सांगितले असल्यामुळे समाज मोठ्या संख्येने यात सहभागी झाला असल्याचे पाहायला मिळत आहे.

महत्वाच्या बातम्या