Ajit Pawar । अजित पवारांना पुण्यातच ठाकरे गटाचा मोठा धक्का

Ajit Pawar । पुणे । २०१९ च्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर अजित पवार चर्चेचा विषय बनला आहे. अजित पवार कधी कोणता निर्णय घेतील हे आता सांगता येणार नाही. सकाळच्या शपथविधीनंतर यावर शिक्कामोर्तब झाले.

महाविकास आघाडीची बोलणी चालू असताना अजित पवार ( Ajit Pawar ) यांनी भाजप सोबत युती करत, देवेन्द्र फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर संपूर्ण राजकारण ढवळून निघाले होते. अजित पवारांवर होणाऱ्या टीकेनंतर फडणवीस-पवार सरकार बरखास्त झाले.

त्या शपथविधी नंतर पून्हा आता अजित पवार भाजप सोबत गेले आहेत. एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. यावर महाविकास आघाडीचे नेते नाराज आहेत तसेच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार अजित पवारांवर ( Ajit Pawar ) बोचऱ्या शब्दात टीका करत आहेत.

Ajit Pawar Shailesh Mohite join Thackeray Group

दरम्यान, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार गटाला मोठा झटका बसला आहे. अजित पवारांचे वर्चस्व असलेल्या पुण्यातच अजित पवार गटाचे आमदार दिलीप मोहिते यांचे चुलत पुतणे शैलेश मोहिते ( Shailesh Mohite ) यांनी ठाकरे गटात प्रवेश केला आहे.

आदित्य ठाकरे यांच्या उपस्थित शैलेश यांनी हातात शिवबंधन बांधले आहे. अजित पवारांना ( Ajit Pawar ) पुण्यातच ठाकरे गटाने मोठा धक्का दिल्याने राजकारणात खळबळ उडाली आहे.

आदित्य ठाकरे पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी शैलेश मोहिते यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. अजित पवारांच्या ( Ajit Pawar ) राष्ट्रवादी काँग्रेसला खेड आणि राजगुरूनगरमध्ये जबर धक्का बसला आहे.

कोण आहेत शैलेश मोहिते पाटील?

शैलेश मोहिते पाटील हे आमदार दिलीप मोहितेंचे चुलत पुतणे आहेत. शैलेश मोहिते ( Shailesh Mohite ) हे राज्य राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस आणि उपाध्यक्ष होते. तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीसही होते.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.