Share

गृहमंत्र्यांना सांगतो, अंतरवालीपासून मुंबईपर्यंत कुठेही अडवायचं नाही, जिथं अडवाल तिथं…: मनोज जरांगे

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटीतून मुंबईकडे निघणार असून त्यांनी आंदोलनाचे टप्पे आणि मुक्कामाची ठिकाणे जाहीर केली आहेत.

Published On: 

Manoj Jarange hunger strike

अंतरवाली सराटी: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटीत उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी १५ व्या दिवशी थेट मुंबईकडे कूच करण्याची घोषणा केली आहे. तसेच, मुंबईला जाणाऱ्या या शांततापूर्ण मोर्चामध्ये पोलीस आणि गृहमंत्र्यांनी कोणताही अडथळा आणू नये, असा थेट इशाराही त्यांनी दिला आहे.

अंतरवालीपासून मुंबईपर्यंत कुठेही बॅरिकेड टाकून अडवायचं नाही. आम्हाला लोकशाही मार्गानं शांततेत उपोषण करायचं आहे. लोकशाही मार्गानं शांततेत आमरण उपोषण करुन आम्हाला आमचा हक्क मिळवायचा आहे. मग तुम्ही अडवता कशामुळं तुम्हाला राज्य अस्थिर करायचं आहे काय? अडवलंच तर शांततेत बसून राहायचं, लांबलचक डांबरावर झोपायचं, बॅरिकेड लोटायचं नाही, असेही जरांगे म्हणाले.

पाच दिवसांच्या या पायी प्रवासानंतर मुंबईतील आझाद मैदानात बेमुदत आमरण उपोषण केले जाणार आहे. जरांगे यांनी आंदोलकांना शिस्तीत सोबत चालण्याचे आणि शांतता राखण्याचे आवाहन करत प्रवासाचे टप्पे जाहीर केले आहेत.

Manoj Jarange announcing Mumbai march for Maratha reservation

मनोज जरांगे यांचा मुंबईला जाण्याचा मार्ग आणि मुक्काम

या मोर्चाचा पहिला मुक्काम बीड जिल्ह्यातील पाटोदा येथे असेल. त्यानंतर अनुक्रमे अहिल्यानगरमधील श्रीगोंदा, पुण्यातील हडपसर आणि रायगड जिल्ह्यातील खोपोली (किंवा कोपरखैरणे) येथे मुक्काम करत पाचव्या दिवशी सकाळी १० वाजता आंदोलक आझाद मैदानात पोहोचतील. अंतरवाली ते पाटोदा या प्रवासात शहागड, गेवराई, बीड, मांजरसुभा आणि लिंबा गणेश या मार्गाचा वापर केला जाणार आहे.

जे समाजबांधव मुंबईला येऊ शकत नाहीत, त्यांनी आपले काम आणि व्यवसाय बाजूला ठेवून रस्त्यावर यावे आणि मोर्चेकरांना आशीर्वाद द्यावेत, अशी भावनिक साद जरांगे यांनी घातली आहे. तसेच, मार्गावरील गावांनी मोर्चेकरांच्या मुक्कामाची आणि निवासाची तयारी करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

मोर्चात सहभागी होणाऱ्यांनी शिस्त पाळत ओव्हरटेक करू नये आणि कोणालाही इजा होऊ देऊ नये, अशा सक्त सूचना त्यांनी दिल्या आहेत. लोकशाही मार्गाने जाणाऱ्या या मोर्चाला पोलिसांनी कुठेही बॅरिकेड्स लावून अडवल्यास, बॅरिकेड्स न लोटता शांतपणे रस्त्यावरच झोपून राहण्याचा आदेश जरांगे यांनी मराठा बांधवांना दिला आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही