काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) अडचणीत सापडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. उत्तराखंडमधील हल्द्वानी पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध एफआयआर (FIR) दाखल करण्यात आला आहे.
अमित कुमार नावाच्या एका तरुणाने केलेल्या तक्रारीच्या आधारे हा एफआयआर दाखल करण्यात आला. राहुल गांधी यांनी अनुसूचित जातींच्या भावना दुखावल्याचा आरोप त्याने या तक्रारीत केला आहे. राहुल गांधी यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल झाल्यामुळे खळबळ उडाली आहे.
Rahul Gandhi FIR case
भारतीय दंड संहितेच्या कलम १९६ आणि २९९ अन्वये राहुल गांधी यांच्याविरुद्ध एफआयआर (FIR) दाखल करण्यात आला आहे. याव्यतिरिक्त, या तक्रारीत ‘अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती कायदा, १९८९’ मधील तरतुदींचाही समावेश करण्यात आला आहे.
हल्द्वानी येथे काँग्रेसच्या रॅलींनंतर आयोजित करण्यात आलेल्या ‘शुद्धीकरण यज्ञा’वर राहुल गांधी यांनी भाष्य केले होते आणि हा विधी दलित-विरोधी असल्याचा आरोप केला होता. मात्र, राहुल गांधी यांच्या या विधानामुळे अनुसूचित जातींच्या भावना दुखावल्या गेल्याचा दावा अमित कुमार यांनी केला आहे.
काय आहे प्रकरण?
८ ऑगस्ट रोजी हल्द्वानी येथे काँग्रेसची रॅली आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर, एका हिंदू संघटनेने कथितरीत्या रामलीला मैदानावर शुद्धीकरणासाठी ‘यज्ञ’ केला. मात्र, त्या ठिकाणी झालेली अस्वच्छता आणि तिथे दिलेल्या कथित घोषणांच्या पार्श्वभूमीवर हा विधी करण्यात आल्याचा दावा संबंधित संघटनेने केला आहे.
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी या शुद्धीकरण विधीला “दलित-विरोधी” ठरवत त्याला उघडपणे विरोध दर्शविला. खर्गे यांच्या या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली.
मल्लिकार्जुन खर्गे यांनी उपस्थित केलेल्या आक्षेपांनंतर, राहुल गांधी यांनी ‘शुद्धीकरण विधी’ हा दलित-विरोधी असल्याचे म्हणत भाजप आणि आरएसएसवर जोरदार टीका केली होती. या विधानाचा संदर्भ देत अमित कुमार यांनी हल्द्वानी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
राहुल गांधी यांनी अनुसूचित जातीच्या समाजाच्या भावना दुखावल्याचा गंभीर आरोप तक्रारदार अमित कुमार यांनी केला. यावरून पोलिसांनी राहुल गांधी यांच्याविरुद्ध एफआयआर (FIR) दाखल केला असून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- ‘१५ दिवसांत निर्णय घ्या, नाहीतर…’; जरांगेंच्या इशाऱ्यानंतर मुंबईत हालचाली, सरकारचं शिष्टमंडळ जाणार अंतरवालीत!
- रोहित पवारांची काँग्रेसशी जवळीक? सुप्रिया सुळेंनी एका वाक्यातच विषय संपवला!
- हवामान विभागाचा १९ राज्यांना धोक्याचा इशारा; महाराष्ट्रात पावसाची दडी संपणार? वाचा नवा अंदाज
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











