‘राहुल गांधींचं रिलाँचिंग थांबवा’; बावनकुळेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप

आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून चंद्रशेखर बावनकुळेंनी काँग्रेस आणि राहुल गांधींवर राजकारणाचा आरोप करत टीका केली.

Published On: 

Chandrashekhar Bawankule on tribal students protest

आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी (Chandrashekhar Bawankule) काँग्रेस आणि राहुल गांधींवर (Rahul Gandhi) जोरदार निशाणा साधत विद्यार्थ्यांचा राजकीय वापर करू नका, असा इशारा दिला.

पुणे, नाशिक आणि नागपूर येथील आदिवासी विद्यार्थी सरकारी वसतिगृहांमधील प्रवेशासाठीची वयोमर्यादा रद्द करणे, रिक्त पदे भरणे आणि इतर मूलभूत मागण्यांसाठी निदर्शने व बेमुदत उपोषण करत आहेत. राहुल गांधी यांनी या विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रही लिहिले होते; याला प्रत्युत्तर म्हणून बावनकुळे यांनी आता राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षावर जोरदार टीका केली आहे.

Chandrashekhar Bawankule on tribal students protest

“आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर राजकारण करून, राहुल गांधींचे महाराष्ट्रातील ‘रिलाँचिंग’ करण्याचा प्रयत्न काँग्रेसने थांबवावा. विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राहुल गांधींच्या पुढील महाराष्ट्र दौऱ्यापर्यंत आंदोलन पेटते ठेवण्याचा काँग्रेसचा डाव आहे. हा प्रकार आदिवासी विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळण्याचा असल्याची टीका महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.

“आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर सरकारने चर्चा केली आहे. त्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेत लिखित आश्वासनही दिले आहे. सरकार विद्यार्थ्यांशी तीनदा चर्चा करु शकते, गरज पडल्यास चौथ्यांदा नव्हे, तर हजारव्यांदा संवाद साधण्याचीही तयारी ठेवते. मग प्रश्न सुटण्याच्या मार्गावर असतानाही आंदोलन सुरू ठेवण्याचा हट्ट का?” असा सवाल बावनकुळेंनी केला आहे.

चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी विद्यार्थ्यांसाठी सुविधा आणि शैक्षणिक संधी वाढविण्यासाठी शासन संवेदनशीलपणे काम करत आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य घडविणे हा सरकारचा उद्देश आहे. मात्र काँग्रेसला विद्यार्थ्यांच्या करिअरपेक्षा आपल्या नेत्यांचे राजकीय करिअर वाचवण्याची अधिक चिंता आहे. हे या आंदोलनाच्या निमित्ताने स्पष्ट होत आहे.”

“आदिवासी समाजाच्या प्रश्नांशी खरोखरच काँग्रेसला आस्था असेल, तर त्यांनी विद्यार्थ्यांना राजकीय आंदोलनाचे साधन बनविण्याऐवजी सरकारसोबत संवाद साधावा. आदिवासी विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळू नका आणि आपल्या राजकीय स्वार्थासाठी त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवू नका. राहुल गांधी यांच्या राजकीय पुनरागमनासाठी आदिवासी विद्यार्थ्यांचा वापर करणे महाराष्ट्र कदापी स्वीकारणार नाही,” असेही बावनकुळे म्हणाले.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही