Share

‘दम असेल तर राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढवा’; ओमराजेंना मकरंदराजेंचं थेट आव्हान

ओमराजे निंबाळकर यांच्या पक्षांतरानंतर बंधू मकरंदराजेंनी नगरसेवकांच्या पक्षांतरावरून थेट आव्हान देत गंभीर इशारा दिला.

Published On: 

Makarandraje Nimbalkar on Omraje Nimbalkar

काही दिवसांपूर्वीच शिवसेना (ठाकरे गट) मध्ये मोठी फूट पडली. या गटातील नऊपैकी सहा खासदारांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश केला.

परिणामी, ठाकरे गटाकडे आता केवळ तीन खासदार उरले आहेत, तर शिंदे गटाचे संख्याबळ वाढले आहे. राज्यातील ‘महायुती’ आघाडीमध्ये आता शिंदे गटाकडे सर्वाधिक खासदार आहेत.

विशेष म्हणजे, धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) हे शिंदे गटात सामील झालेल्या नेत्यांपैकी एक होते. त्यांच्या या निर्णयापाठोपाठ ठाकरे गटातील अनेक नगरसेवकांनीही पक्षांतर केले, ज्यामुळे जिल्ह्यात राजकीय तणाव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे.

Makarandraje Nimbalkar on Omraje Nimbalkar

मकरंदराजे निंबाळकर (Makarandraje Nimbalkar) यांनी त्यांचे बंधू ओमराजे निंबाळकर यांच्या विरोधात अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला आहे. मकरंदराजे यांनी ओमराजे निंबाळकर आणि आमदार राणा पाटील यांना थेट आव्हान दिले आहे.

“खासदार ओमराजे निंबाळकर हे गद्दार आहेत, आमचे नगरसेवक, पंचायत समिती सदस्य फोडायला नको होते, येत्या काळात त्यांना याचे परिणाम भोगावे लागतील. आमच्या शिवसैनिकांकडे वाकड्या नजरेने पाहिल्यास त्याचे गंभीर परिणाम होतील, तुमच्यात दम असेल तर मशाल चिन्हावर निवडून आलेल्या नगरसेवकांचा राजीनामा देऊन, पुन्हा निवडणूक लढवून दाखवा.” असे थेट आव्हान मकरंदराजे यांनी दिले आहे.

काही काळापूर्वीच, शिवसेना (शिंदे गट) ने शिवसेना (ठाकरे गट) च्या सहा खासदारांना आपल्या पक्षात सामील करून घेत त्यांना मोठा धक्का दिला होता. या धक्क्याची चर्चा ताजी असतानाच, आता धाराशिवमधील चार नगरसेवकांनी शिंदे गटात, तर कळंबमधील नऊ नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

या पक्षांतरांच्या पार्श्वभूमीवर, शिवसेना (ठाकरे गट) ने आक्रमक पवित्रा घेत जोरदार टीका केली आहे. तुमच्यात दम असेल तर मशाल चिन्हावर निवडून आलेल्या नगरसेवकांचा राजीनामा देऊन, पुन्हा निवडणूक लढवून दाखवा, असे आव्हानच मकरंदराजे निंबाळकर यांनी केले आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install