Share

कंगना राणावतचं रोखठोक विधान; म्हणाली, “मी काही भाजपची कठपुतळी नाही, उद्या तिकीट नाही मिळालं तरी…”

अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना राणावत हिने मी भाजपची कठपुतळी नसल्याचे म्हणत, तिकीट न मिळाल्यास पुन्हा चित्रपटांकडे वळणार असल्याचे स्पष्ट केले.

Published On: 

Kangana Ranaut Bold Statement on BJP And Politics

भाजप खासदार आणि अभिनेत्री कंगना राणावत (Kangana Ranaut) आपल्या बेधडक वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. पण यावेळी तिने थेट आपल्याच पक्षाला, म्हणजेच भाजपला (BJP) धक्का देणारं एक मोठं विधान केलं आहे.

‘मी काही भाजपची कठपुतळी नाहीये. उद्या पक्ष माझ्या पाठीशी उभा राहील की नाही, हे मला माहिती नाही’, असं अत्यंत रोखठोक मत कंगनाने मांडलं आहे. डीडी न्यूजला दिलेल्या एका विशेष मुलाखतीत तिने ही धक्कादायक भूमिका स्पष्ट केली.

Kangana Ranaut News

तुमची विधाने ही पक्षाची अधिकृत भूमिका असते का? या प्रश्नावर कंगना आक्रमक झाली. ती म्हणाली की, जेव्हा आजूबाजूला गदारोळ असतो, तेव्हा ओरडून बोलावं लागतं. मी जाणूनबुजून असं करत नाही. पण मी काही ‘पपेट’ नाही. भाजप आज माझ्यासोबत आहे, उद्या नसेलही. मी २० वर्षांपासून एक कलाकार आहे आणि माझं स्वतःचं असं एक वेगळं अस्तित्व आहे.

थोडक्यात सांगायचं तर, तिने आपली विचारधारा वैयक्तिक असल्याचं ठणकावून सांगितलंय. पुढच्या वेळी लोकसभेचं तिकीट मिळालं नाही तर? यावर कंगना म्हणाली की, त्यात घाबरण्यासारखं काहीच नाही. तिकीट नाही मिळालं तर माझं अस्तित्व संपणार नाही. मी आजही अनेक मोठ्या दिग्दर्शकांची आवडती अभिनेत्री आहे. माझ्या आयुष्यात करण्यासारखं बरंच काही आहे. तसेच नाव न घेता ‘कॉकरोचची पप्पी तर घेणार नाही ना?’ असा खोचक टोलाही तिने लगावला आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha 1

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही