काही दिवसांपूर्वी, शरद पवार गटाचे नेते आणि माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्यासोबत एकाच विमानाने प्रवास केला होता. त्याआधी त्यांनी ‘महायुती’ आघाडीतील अनेक नेत्यांची भेटही घेतली होती.
त्यामुळे, जयंत पाटील यांची अर्थमंत्री म्हणून नियुक्ती होणार असल्याची चर्चा काही काळ रंगली होती. आता, सांगलीतील एका कार्यक्रमात बोलताना जयंत पाटील यांनी एक महत्त्वपूर्ण विधान केले आहे.
Jayant Patil on political loyalty
“मला पद मिळेल न मिळेल त्यात काय आता लगेच. पण गत सोडायची नसते, पण आपली माणसं आपलीच. आपल्या बरोबर असतात, यालाच राजकारणात महत्व द्यायचे असते आणि निष्ठा महत्वाची आहे. परिस्थिती नुसार बदलत गेले ना तर त्या माणसाची व्हॅल्यू कमी होत जाते. त्यामुळे निष्ठा असणे गरजेचे आहे.” असे विधान जयंत पाटील यांनी सांगलीच्या ईश्वरपूरमध्ये बोलताना केले आहे.
गेल्या काही महिन्यांपासून भाजप नेत्यांशी झालेल्या भेटींमुळे जयंत पाटील एखादा मोठा निर्णय घेणार असल्याची चर्चा जोर धरत होती. इतकेच नव्हे तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांचे पुन्हा एकत्रीकरण होईल, असे दावेही केले जात होते आणि हे दावे अजूनही कायम आहेत.
अशा परिस्थितीत, एका जाहीर सभेत बोलताना जयंत पाटील यांनी पुन्हा एकदा निष्ठेचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांचे खंदे समर्थक दिलीप तात्या पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ‘फिडेल’ (Fidel) या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. हे पुस्तक प्रामुख्याने निष्ठा आणि जीवन या विषयांवर आधारित आहे.
“कृष्णा काठच्या लोकांची आपली परंपरा लढाईची आणि संघर्षाची आहे. संघर्ष करण्याचे या कृष्णा काठच्या लोकांना शिकवले आहे. यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील अनेक नवे आहेत. त्यामुळे कृष्णाकाठची आम्ही माणसं फार वेगळी आहोत. आमच्या मनात काय आहे हे सहजासहज इतरांना कळत नाही,” असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- आयफोन १८ प्रो लाँचची तारीख लीक! नवा कॅमेरा आणि दमदार A20 चिपसेट, खिशाला किती कात्री लागणार?
- धाराशिवमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का; 4 नगरसेवक शिंदे गटात दाखल
- दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवरून Bournvita आणि Amway ला FSSAI चा दणका!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











