Share

स्मार्ट चष्म्यातून छुप्पं रेकॉर्डिंग! दिल्लीतल्या तरुणाचा संताप, ‘मेटा’ला ठोठावला २ कोटींचा दावा

‘रे-बॅन मेटा स्मार्ट ग्लासेस’चा वापर करून नकळत व्हिडिओ रेकॉर्ड केल्याप्रकरणी एका व्यक्तीने मेटा आणि इन्स्टाग्राम क्रिएटरकडे तब्बल २ कोटी रुपयांची नुकसान भरपाई मागितली आहे.

Published On: 

Meta Smart Glasses | Delhi man sues Meta Ray-Ban smart glasses privacy lawsuit

Meta Smart Glasses: तुम्ही एखाद्या कॅफेमध्ये निवांत बसला आहात. अचानक कुणीतरी येतं आणि चष्म्यातून तुमचा व्हिडिओ काढतं तो सोशल मीडियावर व्हायरलही होतो. धक्कादायक वाटतंय ना? पण दिल्लीतील एका व्यक्तीसोबत अगदी हेच घडलंय. आता या व्यक्तीने थेट झुकरबर्गच्या ‘मेटा’लाच कायदेशीर लढाईत खेचलं आहे.

या संतापजनक प्रकारानंतर दिल्लीतील या व्यक्तीने ‘मेटा’ (Meta) आणि संबंधित इन्स्टाग्राम क्रिएटरला थेट कायदेशीर नोटीस बजावली आहे. त्याने फक्त तो वादग्रस्त व्हिडिओ हटवण्याची मागणी केलेली नाही. तर, तब्बल २ कोटी ५ लाख रुपयांची नुकसान भरपाई मागितलीये. सोबतच जाहीर माफीचीही मागणी करण्यात आली आहे.

छुप्या कॅमेऱ्याचा धोका! ‘मेटा’च्या स्मार्ट चष्म्यावर प्रश्नचिन्ह

‘इंटरनेट फ्रीडम फाउंडेशन’ (IFF) या संस्थेने आता या प्रकरणात उडी घेतली आहे. ते या ‘मिस्टर एक्स’ला मोफत कायदेशीर मदत करत आहेत. विशेष म्हणजे, पीडित व्यक्तीने इन्स्टाग्रामकडे आधीच तक्रार केली होती. पण कंपनीने हा व्हिडिओ ‘कम्युनिटी गाईडलाईन्स’चं उल्लंघन करत नसल्याचं सांगून हात झटकले. त्यामुळेच मेटाच्या यंत्रणेवरच मोठे प्रश्न निर्माण झालेत.

२४ जुलै रोजी ‘मिस्टर एक्स’ एका कॅफेमध्ये एकटेच बसले होते. त्यावेळी एका क्रिएटरने त्यांच्या नकळत ‘रे-बॅन मेटा स्मार्ट ग्लासेस’ वापरून त्यांचं चित्रीकरण केलं. २६ जुलैला हा व्हिडिओ अपलोड झाला. बघता बघता त्याला ४ लाखांहून अधिक व्ह्यूज आणि शेकडो कमेंट्स मिळाल्या. एखाद्या अनोळखी व्यक्तीला त्याच्या परवानगीशिवाय असं ‘कंटेंट’ बनवणं कितपत योग्य आहे? हाच खरा सवाल आहे.

थोडक्यात सांगायचं तर, हा गोपनीयतेचा मोठा भंग आहे. मेटाच्या या स्मार्ट चष्म्यात रेकॉर्डिंग सुरू असताना एक छोटा लाईट लागतो खरा. पण तो इतका लहान असतो की कोणाच्याही लक्षात येत नाही. असा चष्मा सामान्य चष्म्यासारखाच दिसतो. सध्या तो वादग्रस्त व्हिडिओ अजूनही इन्स्टाग्रामवर आहे. त्यामुळे आता या कायदेशीर लढाईत मेटा काय पाऊल उचलणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही