‘8.7 कोटी तरुण ना शिक्षणात, ना नोकरीत’; मोदी सरकारवर खर्गेंचा हल्लाबोल

8.7 कोटी तरुण शिक्षण, नोकरी किंवा प्रशिक्षणापासून दूर असल्याचा दावा करत खर्गेंनी मोदी सरकारवर निशाणा साधला.

Published On: 

Mallikarjun Kharge on youth unemployment

दिल्ली : काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी शिक्षण आणि रोजगारावरून मोदी सरकारवर (Modi Government) निशाणा साधला आहे. “मोदी सरकारने तरुणांसाठी शिक्षणापासून ते रोजगारापर्यंतचे मार्ग रोखून ठेवले आहेत आणि संपूर्ण पिढीचे भविष्य धोक्यात आणले आहे.” असा आरोप आरोप खर्गे यांनी केला आहे.

नीती आयोगाच्या आकडेवारीचा संदर्भ देत खर्गे यांनी सांगितले की, १५ ते २९ वयोगटातील ८.७ कोटी तरुण ना शिक्षण घेत आहेत, ना नोकरी करत आहेत, आणि ना कोणतेही प्रशिक्षण घेत आहेत.

Mallikarjun Kharge on youth unemployment

X वरील एका पोस्टमध्ये त्यांनी नमूद केले की, यापैकी सुमारे ८८ टक्के तरुण घरगुती कामांमध्ये गुंतलेले आहेत. ‘पिरियॉडिक लेबर फोर्स सर्व्हे’चा (Periodic Labour Force Survey) हवाला देत त्यांनी निदर्शनास आणून दिले की, तरुणांमधील बेरोजगारीचा दर १५.६ टक्के आहे, तर तरुणींमधील हा दर १९.५ टक्क्यांवर पोहोचला आहे.

पदवीधर तरुणांसाठी रोजगार कुठे आहेत? असा प्रश्न खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विचारला. त्यांनी असा दावा केला की, २० ते २९ वयोगटातील बेरोजगार व्यक्तींमध्ये पदवीधरांचे प्रमाण ६७ टक्के आहे, तर १५ ते २५ वयोगटातील पदवीधरांमध्ये बेरोजगारीचा दर जवळपास ४० टक्के आहे.

रोजगाराचा अभाव; भविष्य धोक्यात

महागडे आणि अपुरे शिक्षण, प्रश्नपत्रिका फुटण्याच्या घटना, भरती प्रक्रियेतील विलंब, वाढती कौशल्य तफावत (skills gap) आणि दर्जेदार रोजगारांची कमतरता यामुळे एका संपूर्ण पिढीचे भविष्य धोक्यात आले आहे. सरकारी धोरणांमुळे शिक्षण महाग झाले असून परीक्षांवरील तरुणांचा विश्वास उडाला आहे, असा आरोप खर्गे यांनी केला.

रोजगाराच्या आश्वासनाचे काय झाले?

दरवर्षी दोन कोटी रोजगार देण्याच्या आश्वासनाचे पुढे काय झाले?, असा प्रश्न काँग्रेस अध्यक्षांनी उपस्थित केला. त्यांच्या मते, या वचनामुळे १२ वर्षांच्या कालावधीत २४ कोटी रोजगार निर्माण व्हायला हवे होते.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही