Share

सुप्रीम कोर्ट धनुष्यबाण गोठवणार? एकनाथ शिंदेंची धाकधूक वाढली

शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्हावरील सुप्रीम कोर्टातील सुनावणीदरम्यान असीम सरोदेंच्या दाव्यामुळे एकनाथ शिंदे गटात धाकधूक वाढल्याची चर्चा आहे.

Published On: 

Eknath Shinde during Supreme Court hearing symbol

मुंबई : सुप्रीम कोर्टात (Supreme Court) गेल्या आठभरापासून ‘धनुष्य-बाण’ चिन्ह आणि पक्षाच्या अस्तित्वाबाबत सुनावणी सुरू आहे. निवडणूक आयोगाच्या (Election Commission)  निर्णयाला आव्हान देण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने (Shivsena) सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती.

या कार्यवाहीदरम्यान ज्येष्ठ वकील कपिल सिबल (Kapil Sibal) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाची बाजू मांडताना जोरदार युक्तिवाद केला आहे. गुरुवारी ते पुन्हा युक्तिवाद करणार आहेत. अशा परिस्थितीत, वकील असीम सरोदे (Advt Asim Sarode) यांनी एक महत्त्वपूर्ण दावा केला आहे, ज्यामुळे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची धाकधूक वाढली आहे.

Eknath Shinde during Supreme Court hearing symbol

“मला वाटते की सुनावणी पूर्ण झाल्यानंतर पुढील एका महिन्यात निर्णय दिला जाईल. या प्रकरणात सत्याचाच विजय झाला पाहिजे. सर्वोच्च न्यायालयावर प्रचंड दबाव आहे. विशेषतः नैतिक जबाबदारी आहे की सत्याचा विजय म्हणजे उद्धव ठाकरे यांचा विजय ठरावा, म्हणजेच मूळ शिवसेना विजयी व्हावी.

परिणामी, ‘धनुष्य-बाण’ चिन्ह गोठवले जाण्याची शक्यता आहे. म्हणजेच ते चिन्ह एकनाथ शिंदे किंवा उद्धव ठाकरे यांपैकी कोणीही वापरू शकणार नाही. शिवसेनेचे नाव ठाकरेंना परत मिळेल, तर एकनाथ शिंदे कदाचित नवीन चिन्ह स्वीकारतील किंवा भाजपमध्ये सामील होतील,” असा दावा असीम सरोदे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला.

“निवडणूक आयोगाने आपली स्वायत्तता अन् स्वातंत्र्य बाजूला ठेवल्याचे दिसत आहे. निवडणूक आयोग ही स्वतंत्र संस्था राहिलेली नाही. ती भाजपची बी-टीम झाली आहे. त्यामुळे त्यांना अधिकार नसताना बक्षीसपत्र लिहून दिल्यासारखे बेकायदेशीर निर्णय दिला आहे,” असे सरोदे यांनी म्हटले आहे.

शिवसेनेचे नाव आणि चिन्हाच्या मालकी हक्काबाबतची सुनावणी गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात होणार आहे. गेल्या तीन-चार सुनावण्यांमध्ये ज्येष्ठ वकील कपिल सिबल हे उद्धव ठाकरे गटाची बाजू मांडत आहेत.

बुधवारीही या प्रकरणावर सुनावणी झाली, ज्यामध्ये सिबल यांनी प्रभावी युक्तिवाद केला. बुधवारच्या सुनावणीदरम्यान कपिल सिबल यांनी निवडणूक आयोगावर कडक शब्दांत टीका केली.

१९९९ च्या परिस्थितीत ‘पक्षप्रमुख’ हे पद अस्तित्वात नव्हते, याची जाणीव आयोगाला २०२६ मध्येच झाली का?, असा प्रश्न सिबल यांनी उपस्थित केला. निवडणूक आयोग आपल्या सोयीनुसार निर्णय घेते, असेही सिबल यांनी नमूद केले.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही