Share

“रस्ते, पाणी, नोकरी तेच प्रश्न कायम”; टक्केवारीच्या राजकारणावर राज ठाकरेंची टीका

मुंबई-गोवा महामार्गाचे काम रखडण्यामागे टक्केवारीच्या राजकारणाचा प्रभाव असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला आहे.

Published On: 

Raj Thackeray on Mumbai-Goa Highway delays

मुंबई : मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आज सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी त्यांची भेट घेतली. मिळालेल्या माहितीनुसार, या भेटीदरम्यान कोकण भागातील रस्त्यांची दुरवस्था आणि शिवाजी पार्कशी संबंधित विविध मुद्द्यांवर चर्चा झाली.

रत्नागिरी जिल्ह्यातील मुंबई-गोवा महामार्गाशी (Mumbai-Goa Highway)  संबंधित समस्यांबाबत राज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. महामार्गाच्या सद्यस्थितीची पाहणी करण्यासाठी त्यांनी ९ ऑगस्ट रोजी रायगडमधील माणगाव बायपासला भेट दिली होती.

Raj Thackeray on Mumbai-Goa Highway delays

मुंबई-गोवा महामार्गाचे रखडलेले काम, स्थानिक राजकीय हस्तक्षेप आणि विकासकामांमध्ये पारदर्शकता असण्याची गरज या मुद्द्यांवर त्यांनी यापूर्वी भाष्य केले होते. कामापेक्षा आपल्याला टक्के कसे मिळतील याचाच विचार केला जातोय, असा आरोप राज ठाकरे यांनी केला होता. या पार्श्वभूमीवर त्यांनी आज देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत प्रामुख्याने रस्ते पायाभूत सुविधा आणि इतर विविध मुद्द्यांवर चर्चा झाल्याचे समजते.

“मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेल्या १७ वर्षांपासून रखडले आहे. त्यामुळे कोकण भागातील रहिवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. माणगाव बायपासचे रखडलेले काम हा एक मोठा अडथळा आहे. राज ठाकरे यांनी स्वतः या प्रकल्पाची पाहणी केली होती. तसेच पत्रकार परिषद घेऊन राजकीय हस्तपेक्षामुळे मुंबई-गोवा महामार्ग रखडला.” असे राज ठाकरे यांनी सांगितले.

“आमच्या जमिनी, आमचं पाणी आणि यावर बाहेरचे लोक पोसले जाणार आहेत. कोकणात आपल्या पायाखालच्या जमिनी खेचल्या जातायत आणि त्यामुळे असं वाटतंय की आता विकासच नको. १५ वर्षांपासून तीच गोष्ट सुरू आहे. तेच खड्डे, तोच ट्रॅाफिक जाम, आपल्याकडे निवडणुकीत तेच तेच विषय असतात. नोकरी, पाणी, रस्ते…, सगळे आमदार एकत्र आली असती तर इतकी वर्षे लागली नसती,” असेही राज ठाकरे म्हणाले.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही