Share

“मोदी-भाजपची लोकप्रियता घसरली”; बांकीपूर निकालावर संजय राऊतांची प्रतिक्रिया

बांकीपूर पोटनिवडणुकीतील भाजपच्या पराभवावर संजय राऊतांनी मोदी-भाजपची लोकप्रियता घसरल्याचा दावा केला आणि विरोधकांचा आत्मविश्वास वाढल्याचे म्हटले.

Published On: 

Sanjay Raut reacts to BJP defeat in Bankipur by-election

मुंबई : खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज बांकीपूरमधील (Bankipur) भाजपच्या (BJP) पराभवाचे विश्लेषण केले आणि या पोटनिवडणुकीच्या निकालांचा संभाव्य परिणाम यावर चर्चा केली. राम मंदिरात झालेल्या चोरीच्या मुद्द्यावर राऊत यांनी यापूर्वी आक्रमक भूमिका घेतली होती, मात्र सिद्धिविनायक मंदिरात झालेल्या चोरीबाबत विचारले असता त्यांनी थेट उत्तर देणे टाळले. “बांकीपूर हे सध्याच्या राष्ट्रीय वातावरणाचे आणि मोदी (Modi) व भाजपच्या (BJP)  घटत्या लोकप्रियतेचे उदाहरण आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन (Nitin Navin) यांच्याकडे असलेली जागा तुम्ही जिंकू शकला नाहीत, जी जागा त्यांनी यापूर्वी ४०,००० मतांच्या फरकाने जिंकली होती,” असे राऊत म्हणाले.

“जंतर-मंतरवरील ‘जनरेशन झेड’ (Gen Z) चे आंदोलन, राम मंदिरातील (Ram Mandir) चोरीबाबत तुमची शांतता आणि नितीन नवीन यांच्या प्रचारसभेत ‘बजरंगबली’ला नाचवणे, या कृतींमुळे लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या. हनुमानाला नाचवणे आणि ‘जनरेशन झेड’च्या आंदोलकांवर गोळीबार करणे, या सर्व गोष्टींचा मतदारांवर प्रभाव पडला. बिहारच्या जनतेच्या डीएनएमध्ये राजकारण आहे,” असे संजय राऊत यांनी नमूद केले.

Sanjay Raut reacts to BJP defeat in Bankipur by-election

राम मंदिराप्रमाणेच सिद्धिविनायक मंदिरातही चोरीचे आरोप समोर आले आहेत. यात सामील असलेल्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती विशाखा राऊत यांनी केली होती, असा आरोप सदा सरवणकर यांनी केला आहे. या प्रकरणावर पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, “ज्या गोष्टींची मला माहिती नाही, त्याबद्दल मी बोलणार नाही. हा एक तांत्रिक मुद्दा आहे. मी या विषयाच्या तपशीलात गेलो नाही. मला त्याबद्दल काहीच माहित नाही.”

“पोटनिवडणुकीचे निकाल विरोधी पक्षांचा आत्मविश्वास वाढवतात आणि लोकांना त्यांच्या कृतींना पाठिंबा असल्याचे दर्शवतात. पोटनिवडणुकीचा इतिहास पाहता, अलाहाबाद पोटनिवडणुकीतील व्ही.पी. सिंग यांचा विजय हा काँग्रेस पक्षाच्या पतनाला सुरुवात ठरला होता. भाजपलाही पोटनिवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला आहे, असे निकाल विरोधकांचा आत्मविश्वास उंचावतात.” असे राऊत म्हणाले.

मोहन भागवत ‘जनरेशन झेड’शी (Gen Z) संवाद साधणार आहेत. यावर भाष्य करताना राऊत म्हणाले, “ते कदाचित संघातील नेत्यांची मुले आणि नातवंडे यांनाच तिथे आणतील, कारण दुसरे कोण जाणार? भाजप नेत्यांची मुले आणि नातवंडे हे ‘जनरेशन झेड’चे प्रतिनिधित्व करत नाहीत. ‘जनरेशन झेड’ म्हणजे ती तरुण पिढी जी निषेध करण्यासाठी जंतरमंतरवर आली होती, ज्यांनी घोषणा दिल्या आणि ज्यांच्यावर अश्रूधुराची नळकांडी (tear gas shells) सोडण्यात आली होती. त्यापैकी २,००० तरुणांना बोलवा आणि त्यांच्याशी संवाद साधा.”

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही