Share

एका धुरंधाराला पुरस्कार देण्यासाठी एक धुरंधर आले – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

लोकमान्य टिळक पुरस्कार सोहळ्यात देवेंद्र फडणवीस यांनी अमित शहा यांना ‘राजकारणातील चाणक्य’ म्हणत अजित डोवाल यांच्या कार्याचा गौरव केला.

Published On: 

CM Devendra Fadnavis praises Amit Shah and Ajit Doval

पुणे : पुण्यात (Pune) भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचा ‘लोकमान्य टिळक पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात आला. टिळक महाराष्ट्र विद्यापीठात आयोजित या विशेष कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) उपस्थित होते. या समारंभात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या हस्ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. उपस्थितांना संबोधित करताना देवेंद्र फडणवीस यांनी अमित शाह यांचे वर्णन ‘राजकारणातील चाणक्य’ असे केले.

अमित शाह यांच्या उपस्थितीत देवेंद्र फडणवीस यांनी प्रभावी भाषण केले. “आजचा दिवस सर्वांसाठी आनंदाचा आहे. देशातील अनेक दिग्गज व्यक्तिमत्त्वांना ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान करण्यात आला आहे. यावर्षी हा पुरस्कार अजित डोवाल यांना देण्यात आला आहे, ज्यांनी राष्ट्रीय सुरक्षेला नवी दिशा दिली आहे. ‘एका धुरंधाराला पुरस्कार देण्यासाठी एक धुरंधर आले,” असे फडणवीस म्हणाले. त्यांनी अमित शाह यांचा उल्लेख राजकारणातील ‘धुरंधर’ व्यक्तिमत्त्व असा केला.

CM Devendra Fadnavis praises Amit Shah and Ajit Doval

भाषणात पुढे फडणवीस यांनी नमूद केले की, राष्ट्रीय सुरक्षेच्या क्षेत्रात चाणक्य म्हणून ओळखले जाते, त्यांना राजकारणातील चाणक्य अशी ओळख असलेले अमित शहा यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला आहे. त्यांनी डोवाल यांच्या कार्यावर, विशेषतः २०१४ पासून देशाच्या सुरक्षा व्यवस्थेत घडवून आणलेल्या आमूलाग्र बदलांवर प्रकाश टाकला आणि या प्रसंगाला एक उत्तम व शुभ योगायोग म्हटले. आज भारत हा केवळ आघात सहन करणारा देश राहिलेला नाही, तर शत्रूच्या घरात घुसून प्रहार करणारा देश बनला आहे, असे फडणवीस यांनी अधोरेखित केले.

भारतीय राष्ट्रवादाचे जनक

भारतीय राष्ट्रवादाचे जनक मानल्या जाणाऱ्या लोकमान्य टिळकांच्या नावाने दिला जाणारा हा पुरस्कार डोवाल यांना प्रदान केला जात आहे. ज्या पिढीला वाटायचे की इंग्लंडच्या राणीच्या आशीर्वादाने नाही तर स्वातंत्र्य हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो आम्ही मिळवणार अशी घोषणा टिळकांनी केली. लोकांनी जपलेल्या धार्मिक भावनेचा विचार करून सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून समाजाला एकत्र आणणाऱ्या आणि स्वातंत्र्यलढ्याची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या लोकमान्यांमध्ये देशभक्ती व त्यागाची भावना मूर्तिमंत होती, असे प्रतिपादन देवेंद्र फडणवीस यांनी केले. तसेच, लोकमान्यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार अजित डोवाल यांना मिळाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.

अजित डोवाल यांना वयाच्या शंभरीपर्यंत राष्ट्रसेवा करण्याची शक्ती मिळो, अशी प्रार्थना करत फडणवीस यांनी उपस्थितांची मने जिंकली. अशा महान व्यक्तिमत्त्वाच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार केवळ राष्ट्रभक्तीची भावना अंगी बाळगणाऱ्या व्यक्तीलाच दिला जावा आणि अजित डोवाल यांना तो देऊन योग्य सन्मान करण्यात आला आहे, असे त्यांनी ठामपणे सांगितले.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही