Share

Ketan Agrawal Death Case: मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय; उज्ज्वल निकम यांची एन्ट्री

केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला मंजुरी दिली आहे. यामुळे सिया गोयलच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

Published On: 

Ketan Agrawal Death Case: मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय; उज्ज्वल निकम यांची एन्ट्री

पुणे : पुण्यातील केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठी घडामोड समोर आली आहे. या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam) यांची नियुक्ती करण्याचा निर्णय राज्य सरकारने (State Govt) घेतला आहे.

18 जून रोजी लोहगड किल्ल्यावरून पडून केतन अग्रवाल (Ketal Agrawal) यांचा मृत्यू झाला होता. सुरुवातीला हा अपघात असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र, पोलिसांच्या तपासानंतर या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले. पोलिसांच्या तपासानुसार, केतनची होणारी पत्नी सिया गोयल (Siya Goyal) आणि तिचा कथित प्रियकर चेतन चौधरी (Chetan Chaudhari)  यांनी कट रचून केतनला लोहगडावर नेले आणि दरीत ढकलल्याचा आरोप आहे. या प्रकरणात दोघांना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

केतन अग्रवाल यांचे वडील विशाल अग्रवाल (Vishal Agrawal) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांची भेट घेतली. माझ्या मुलाला न्याय मिळावा आणि दोषींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी केली. या मागणीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलदगती न्यायालय स्थापन करण्यास तसेच विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यास मान्यता दिली आहे. विधी व न्याय विभागाला याबाबत आवश्यक निर्देश देण्यात आले आहेत.

दरम्यान, या प्रकरणात सिया गोयलच्या भावाचीही पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. लोणावळा ग्रामीण पोलिसांनी साहिल गोयल याला जबाब नोंदवण्यासाठी बोलावले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, साहिल गोयलला तपासाशी संबंधित प्रश्न विचारण्यात येत असून कागदोपत्री पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे. अग्रवाल कुटुंबीयांनी केलेल्या आरोपांच्या दिशेनेही तपास केला जात असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीनंतर केतन अग्रवाल प्रकरणाकडे राज्यभराचे लक्ष लागले आहे. पुढील न्यायालयीन प्रक्रियेत महत्त्वाच्या घडामोडी होण्याची शक्यता आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही