Share

“पाणी नाही, पण दारू मात्र मिळते!”; अजित पवारांच्या ‘त्या’ होर्डिंगवरून ठाकरेंचा संतापजनक सवाल

“पाणी नाही, पण दारू मात्र मिळते,” अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी अजित पवारांच्या ‘नशामुक्त’ अभियानाची खिल्ली उडवली. पाणीप्रश्नावरून त्यांनी सरकारला घेरले.

Published On: 

Uddhav Thackeray, Ajit Pawar

🕒 1 min read

छत्रपती संभाजीनगर: “जनतेला पिण्यासाठी पाणी द्यायला यांच्याकडे नियोजन नाही, पण दारूचे परवाने मात्र ‘फास्ट ट्रॅक’वर दिले जातात. हेच का तुमचे सुराज्य?” असा जळजळीत सवाल करत उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) आज महायुती सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढले. संभाजीनगरमधील सभेत त्यांनी पाणीप्रश्न आणि नशामक्तीच्या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना थेट लक्ष्य केलंय.

‘नशामुक्त’ होर्डिंग आणि ठाकरेंचा टोला

शहरात सध्या अजित पवारांच्या (Ajit Pawar) राष्ट्रवादी काँग्रेसने लावलेल्या ‘संभाजीनगर नशामुक्त करू’ या होर्डिंग्जची जोरदार चर्चा आहे. पण याच होर्डिंग्जची ठाकरेंनी आपल्या भाषणात अक्षरशः पिसे काढली. ते म्हणाले, “राज्यात सरकार तुमचंच आहे, सत्तेच्या चाव्या तुमच्या हातात आहेत. मग शहराला नशामुक्त करायला मुहूर्त कशाचा शोधताय? महापालिका मिळाली तरच काम करणार का?” सत्तेत असूनही आश्वासनांचे गाजर दाखवणाऱ्या नेत्यांना आता जनताच जाब विचारेल, असा इशारा त्यांनी दिला.

Uddhav Thackeray Slams Ajit Pawar

तहानलेल्यांना पाणी नाही, पण मद्यप्रेमींची सोय!

संभाजीनगरकरांच्या जिव्हाळ्याचा पाणीप्रश्न (Water Crisis) मांडताना ठाकरे आक्रमक झाले. “दुर्दैव बघा, आज या शहरात लोकांना प्यायला पाणी मिळत नाही, पण दारूचे परवाने (Liquor Licenses) मात्र झटपट वाटले जात आहेत. तहानलेल्या जनतेला पाणी देण्याऐवजी तुम्ही त्यांना नशेत ठेवू पाहताय का?” असा घणाघाती आरोप त्यांनी केला.

दुतोंडी भूमिका खपवून घेणार नाही

“एकीकडे नशामक्तीच्या गप्पा मारायच्या आणि दुसरीकडे दारूची दुकानं उघडायला परवानग्या द्यायच्या, ही तुमची दुतोंडी भूमिका आता लपून राहिलेली नाही,” असे सुनावत ठाकरेंनी अजित पवारांची कोंडी केली. सत्तेचा वापर फक्त स्वतःचे हित साधण्यासाठी करणाऱ्यांना जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही