🕒 1 min read
जालना – “लाडकी बहीण योजना फक्त निवडणुकीपुरती आहे, नंतर ती बंद पडेल,” अशा चर्चांनी जोरात उच्छाद मांडला होता. पण आता या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. ‘स्टील सिटी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जालन्यातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महिलाना सर्वात मोठा दिलासा दिला आहे. “लाडकी बहीण योजना एक वर्षानंतरही बंद झाली नाही आणि ती भविष्यातही कधीच बंद होणार नाही,” अशी खणखणीत ग्वाही त्यांनी दिली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणी आता खऱ्या अर्थाने ‘मालामाल’ होणार आहेत.
Devendra Fadnavis on Ladki Bahin Yojana
जालन्यात एक ऐतिहासिक क्षण पाहायला मिळत आहे. तब्बल ९० वर्षांनंतर येथे महानगरपालिकेची पहिली निवडणूक होत आहे. या पहिल्या-वहिल्या निवडणुकीच्या रणधुमाळीत मुख्यमंत्री स्वतः मैदानात उतरले. जालनेकरांना मनापासून नमस्कार करत त्यांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली आणि थेट विरोधकांच्या वर्मावर बोट ठेवलं.
विरोधक सतत ओरडत होते की ही लाडकी बहीण योजना तात्पुरती आहे. याला सडेतोड उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, “आमच्या लाडक्या बहिणींना कोणीही वारंवार भीती घालू नये. जोपर्यंत आमचं सरकार आहे, तोपर्यंत ही योजना अविरत सुरूच राहील.” जालन्याच्या विकासाचा मुद्दा मांडतानाच त्यांनी महिला सक्षमीकरणाचा नारा दिला. ९० वर्षांनी होत असलेल्या या निवडणुकीत जालन्याची जनता भाजपच्या पारड्यात माप टाकणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
📌 महत्वाच्या बातम्या
- “पूर्वी इंग्रज होते, आता भाजपवाले इंग्रज…”; काकांनी भररस्त्यात फडणवीस सरकारची ‘शाळा’ घेतली!
- “मी परळी धनुभाऊंना देऊन टाकली…”; पंकजा मुंडेंचा मोठा निर्णय! आता ‘या’ मतदारसंघावर लक्ष
- स्वतःचीच नक्कल पाहून आमिर खान संतापला की हसला? सुनील ग्रोव्हरबद्दल ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ने दिलं थेट उत्तर!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












