🕒 1 min read
पिंपरी-चिंचवड: तुम्हाला वाटत असेल की राजकारणात फक्त जमिनीचे किंवा टेंडरचे घोटाळे होतात, पण थांबा… इथे तर सत्ताधाऱ्यांनी कुत्र्यांच्या नसबंदीतही पैसे खाल्लेत! राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवडमधील भाजपच्या कारभाराचे वाभाडे काढले आहेत.
पिंपरी-चिंचवडमध्ये सध्या जे चाललंय, त्याला विकास म्हणायचं की दिवसाढवळ्या पडणारा दरोडा? अजित पवारांच्या भाषेत सांगायचं तर, शहरात सध्या ‘लुटारूंची टोळी’ फिरतेय. अजितदादांनी ( Ajit Pawar ) आज पत्रकार परिषदेत भाजपवर सडकून टीका केली नाही, तर अक्षरशः “भाजपची राक्षसी भूक मला पाहवत नाही” अशा शब्दांत संताप व्यक्त केला.
४८४४ कोटींचे २००० कोटी कसे झाले?
२०१७ पूर्वी जेव्हा राष्ट्रवादीची सत्ता होती, तेव्हा महापालिकेच्या ठेवी ४८४४ कोटी होत्या. आज त्या २००० कोटींवर आल्यात. इतकंच नाही, तर वरून महापालिकेला कर्जबाजारी करून ठेवलंय. “एवढा पैसा खर्च केला, तर तो गेला कुठे? रस्ते तर आहेत तिथेच आहेत!” स्मार्ट सिटीच्या नावाखाली फक्त रस्ते खोदून ठेवलेत आणि तिथे ‘खोदाई माफिया’ फोफावलाय. जिओ, एअरटेलवाल्यांनी रस्ते चाळण केलेत आणि सत्ताधारी गप्प आहेत.
Ajit Pawar slams BJP over massive corruption in PCMC
भाजपच्या काळात स्थायी समितीच्या अध्यक्षाला लाचलुचपत विभागाने अटक केली, हे महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच घडलं. निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी चक्क सिनेस्टाईल पाठलाग करून उमेदवारांचे अपहरण केले जात आहे. “सत्तेची मस्ती, माज आणि नशा आलीये,” असा घणाघात दादांनी केलाय.
थोडक्यात काय, तर पिंपरी-चिंचवडमध्ये सध्या विकासापेक्षा ‘वसुली’ आणि ‘रिंग’ संस्कृती जोरात आहे, असा थेट आरोप पवारांनी केलाय. आता यावर भाजप काय उत्तर देणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
📌 महत्वाच्या बातम्या
- उद्धव ठाकरेंचा तोफखाना! एकनाथ शिंदेंची तुलना थेट ‘सूर्याजी पिसाळ’शी; म्हणाले, “ही गद्दारी ४०० वर्ष…”
- “हा तर फक्त ट्रेलर, पिक्चर अभी बाकी!” लक्ष्मण हाकेंनी फोडला बॉम्ब; ‘या’ ४ बड्या नेत्यांची नावं घेत थेट चॅलेंज!
- जेम्स कॅमेरॉन यांची मोठी घोषणा: ‘टर्मिनेटर’ परत येणार, पण अर्नोल्ड आणि सारा कॉनर नसणार!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












