Share

भाजपची ‘इमेज’ वाचवण्यासाठी फडणवीसांचा हस्तक्षेप; नाशिकच्या बागुल-राजवाडे यांचा पक्षप्रवेश लांबणीवर!

Devendra Fadnavis reportedly intervened to halt BJP entry of Sunil Bagul and Mama Rajwade from Nashik due to criminal backgrounds, saving party image.

Published On: 

Maratha Reservation devendra fadnavis

नाशिक: सुनील बागुल आणि मामा राजवाडे यांचा गुरुवारी (३ जुलै) भाजपमध्ये प्रवेश होणार होता. मात्र, गुन्हे दाखल असलेल्या या दोन्ही नेत्यांच्या पक्षप्रवेशावरून भाजपवर होत असलेली टीका आणि खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्तक्षेपामुळे त्यांचा प्रवेश तात्पुरता थांबवण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे भाजपची संभाव्य बदनामी टळल्याचे बोलले जात आहे.

मामा राजवाडे आणि सुनील बागुल यांच्यावर मारहाणीसह इतर गंभीर गुन्हे दाखल आहेत. गुन्हे दाखल झाल्यापासून हे दोन्ही नेते फरार होते, तरीही त्यांचा भाजप प्रवेश गिरीश महाजन यांच्या माध्यमातून होणार होता. मात्र, ऐनवेळी हा प्रवेश रद्द करण्यात आला.

या पक्षप्रवेशावरून भाजपची प्रतिमा मलिन होण्याची शक्यता होती. विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्याचे गृहमंत्री असल्याने, फरार आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या नेत्यांच्या पक्षप्रवेशामुळे समाजात चुकीचा संदेश जाण्याची शक्यता होती. त्यामुळे, फडणवीस यांच्या थेट हस्तक्षेपामुळेच हा पक्षप्रवेश लांबणीवर पडल्याचे समजते. आता सुनील बागुल आणि मामा राजवाडे यांना जामीन मिळाल्यानंतरच त्यांच्या भाजप प्रवेशाचा निर्णय घेतला जाईल, असे म्हटले जात आहे.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच ठाकरे गटाने मामा राजवाडे आणि सुनील बागुल यांच्यावरील गुन्हे मागे घेण्यासाठी पोलीस आयुक्तांची भेट घेतली होती. पण भाजपमध्ये प्रवेशाची चर्चा सुरू होताच, ठाकरे गटाने तातडीने कारवाई करत सुनील बागुल यांची उपनेतेपदावरून, तर मामा राजवाडे यांची महानगरप्रमुख पदावरून हकालपट्टी केली.

‘ना घर का, ना घाट का’ स्थिती?

आता भाजपमध्ये प्रवेश थांबल्याने आणि ठाकरे गटातून हकालपट्टी झाल्याने, सुनील बागुल आणि मामा राजवाडे यांची सध्या ‘ना भाजपचे, ना ठाकरेंच्या शिवसेनेचे’ अशी ‘त्रिशंकू’ अवस्था झाली आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही