🕒 1 min read
मुंबई | खासदार संजय राऊत यांच्या ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात प्रसिद्ध गीतकार आणि लेखक जावेद अख्तर ( Javed Akhtar ) यांनी राऊत यांचं भरभरून कौतुक केलं. ते म्हणाले, “संजय राऊत हे टी-20 क्रिकेटसारखे खेळाडू आहेत. ते फक्त चौकार आणि षटकारच मारतात. घाबरत नाहीत आणि चेंडू थेट स्टेडियमबाहेर टोलवतात.” ते पुढे म्हणाले, “माझे त्यांच्याशी चांगले संबंध आहेत आणि ते लोकशाहीत अत्यंत गरजेचे असणारे निर्भीड व्यक्तिमत्त्व आहे.”
Javed Akhtar expresses deep gratitude to Mumbai
“मी जे काही मिळवलं ते मुंबई आणि महाराष्ट्रामुळे मिळालं. सात जन्मातही मुंबईचं ऋण फेडू शकणार नाही. गेल्या ३० वर्षांत मला चार वेळा पोलीस संरक्षण मिळालं. त्यापैकी तीन वेळा धर्मांध लोकांकडून धमक्या मिळाल्या होत्या. पण मुंबई पोलिसांनी मला सुरक्षित ठेवलं.”
जावेद अख्तर यांनी सांगितले की, “पूर्वी ए. एन. रॉय पोलीस आयुक्त होते. त्यांनी मला वेळच्या वेळी मदत केली. म्हणूनच ही मुंबई माझ्या हृदयात आहे आणि राहील.”
जावेद अख्तर यांनी त्यांच्या सोशल मिडिया अनुभवाबाबतही बोलताना म्हटले, “काही लोक माझ्यावर शिव्या देतात, तर काही कौतुक करतात. काही मला काफीर म्हणतात तर काही जिहादी, काहींनी पाकिस्तानात जाण्याचा सल्ला दिला. पण जर मला पाकिस्तान आणि नरक यात निवड करायची असेल तर मी नरकात जाणे पसंत करेन,” अशी थेट प्रतिक्रिया दिली.
📌 महत्वाच्या बातम्या
- हे सरकार उद्या जाणारच! उद्धव ठाकरे यांचा मोदी-फडणवीसांवर घणाघात
- शिव्या, कौतुक, काफीर ते जिहादी म्हणणारेही; तरीही पाकिस्तानाऐवजी नरकात जाणे पसंत – जावेद अख्तर
- सासऱ्यावर फिदा! विवाहित महिला दागिने, दोन मुली घेऊन पळाली; नवऱ्याची शोधणाऱ्याला २० हजारांची ऑफर













