इटावा (उत्तर प्रदेश) | प्रेम आंधळं असतं असं म्हटलं जातं, आणि ते कोणावर कधी जडेल हे सांगता येत नाही. उत्तर प्रदेशातील इटावा जिल्ह्यातील एका महिलेनं आपल्याच चुलत सासऱ्यासोबत पळून जाऊन हे सिद्ध केलं आहे. विशेष म्हणजे ती विवाहित असून तिला तीन अपत्यं आहेत. ती सासऱ्यासोबत दोन मुलींना घेऊन पळाली असून घरातून लाखोंचे दागिने आणि रोख रक्कमही घेऊन गेली आहे.
ही घटना 3 एप्रिल 2025 रोजी घडली असून एक महिना उलटूनही महिला आणि तिचा सासरा पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. पीडित पती कारचालक असून तो त्या दिवशी कानपूरला गेला होता. घरी परतल्यानंतर त्याला पत्नी आणि मुली गायब असल्याचं आढळलं. त्याने तात्काळ ऊसराहार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
Woman Runs Away with Father-in-law in UP
पीडिताचा आरोप आहे की, त्याच्या चुलत काकानं म्हणजेच पत्नीच्या चुलत सासऱ्यानंच तिला फूस लावून पळवून नेलं आहे. ही महिला घरातून चार अंगठ्या, एक सोन्याचा हार, मंगळसूत्र आणि ५० हजार रुपये घेऊन गेली. महिलेच्या पतीने पत्नीचा शोध घेण्यासाठी नातेवाईक, गावकरी, ओळखीचे अशा सर्वत्र धावपळ केली. पण कुठेही काही पत्ता लागला नाही. आता तो निराश होऊन पत्नीचा पत्ता सांगणाऱ्याला २०,००० रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा करत आहे.
पोलिसांनी तक्रार नोंदवली असून दोन तपास पथक तयार करण्यात आली आहेत. लवकरच महिला आणि तिच्या सासऱ्याचा ठावठिकाणा लागेल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- शिवराज दिवटे प्रकरणात कुटुंबावर दबाव; बीडमधील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
- शिवराजला मारणाऱ्यांवर मकोका लागला पाहिजे, बीडची पोलीस यंत्रणा कुचकामी – धनंजय देशमुख
- IPL 2025: प्लेऑफची आशा टिकवण्यासाठी दिल्लीची गुजरातविरुद्ध परीक्षा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












