🕒 1 min read
Pahalgam Attack | पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने घेतलेली आक्रमक भूमिका पाहता पाकिस्तानमध्ये प्रचंड खळबळ उडालेली दिसते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले आहे की, “हल्लेखोर आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही.”
या इशाऱ्यानंतर पाकिस्तानने सुद्धा आपल्या हालचाली वाढवल्या असून, पाकिस्तान-व्याप्त काश्मीरमधील (POK) अनेक गावांमध्ये नागरिकांच्या घरांचा ताबा घेऊन सैन्याने तेथे बंकर उभारले आहेत. एवढंच नव्हे तर अनेक भागांमध्ये वॉर सायरन वाजवण्यात आले आहेत, जेणेकरून नागरिक सतर्क राहतील.
After Pahalgam Attack, India’s Aggressive Stance
भारताने पाकिस्तानविरोधात बहुआयामी रणनीती आखत, त्याची चहूबाजूंनी कोंडी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये भारत-पाकिस्तानमधील सिंधू जल करार स्थगित ठेवण्याचा विचार, वाघा-अटारी बॉर्डर बंद करणे, तसेच भारत-पाकिस्तान दरम्यान चालणारी पोस्ट सेवा आणि पाकिस्तानी जहाजांना बंदी घालण्याचा निर्णय यांचा समावेश आहे.
भारताची ही ठाम आणि आक्रमक भूमिका पाहता, पाकिस्तानमध्ये एक प्रकारची घाबरगुंडी निर्माण झाली असून, त्याचा थेट परिणाम POKमधील सुरक्षाव्यवस्थेवर दिसून येत आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- भारताच्या पाकिस्तानविरोधात आक्रमक कारवाई: दहशतवादी हल्ल्यानंतर 6 महत्त्वाचे निर्णय
- मैत्री जुनी आहे, पण मी एकनाथ शिंदेंकडे काही मागत नाही – नाना पाटेकर
- अजित पवारांचे स्वप्न मुख्यमंत्रीपदाचेच; सुनील तटकरे म्हणाले, पुढची शपथ ही….!













