🕒 1 min read
राजेभाऊ मोगल । छत्रपती संभाजीनगर : आठ दिवसापूर्वी अमित शहा ( Amit Shah ) यांनी ‘राष्ट्रवादी’चे शरद पवार (Sharad Pawar ) यांना भ्रष्टाचाऱ्यांचे सरदार म्हटले होते. त्यांच्या या आरोपाला शरद पवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. “ज्यांना गुजरात दंगलीप्रकरणी कोर्टाने तडीपार केलं, तो व्यक्ती देशाच्या संरक्षणाची जबाबदारी सांभाळत आहे. ही एक गंमतच असल्याचा टोला पवारांनी लगावला आहे.
पवार म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi ) म्हणाले होते, माझं बोट धरून राजकारणात आलो. मात्र, त्यावर माझा विश्वास नाही. कारण मला माझ्या बोटावर विश्वास आहे, की ते कुणाच्या हातात दिलं नाही, अशी खोचक टीकाही पवार यांनी केली.
प्राचार्य मगदूम फारुकी यांनी उर्दूत भाषांतरीत केलेल्या “शरद पवार द ग्रेट एग्निमा” या पुस्तकाचे शरद पवार यांच्याच हस्ते शुक्रवारी (ता.२६) छत्रपती संभाजीनगर येथे प्रकाशन करण्यात आले. त्यावेळी पुस्तकातील जुन्या गोष्टींना त्यांनी उजाळा देत, केंद्र सरकारच्या कार्यपद्धतीवर जोरदार टीका केली.
आज देशाची परिस्थिती बदलली आहे. निवडणुकीची परिस्थिती कशी होती. देशाचे पंतप्रधान त्यांचे सहकारी काय बोलत होते? बंगळूर मध्ये सांगितलं आम्हाला ४०० पार करायचं आहे. ज्यांना संविधान बदलायच आहे, देशाचं संविधान देशाच्या प्रत्येक व्यक्तीला अधिकार देते ते बदलणं लोकांना आवडले नाही. यामुळे लोकांनी त्यांना धडा शिकवला आहे.
महत्वाच्या बातम्या
- सुरक्षिततेच्या कारणास्तव सातारा जिल्ह्यातील धबधबे व पर्यटनस्थळे पर्यटकांना तात्पुरत्या स्वरुपात बंद
- आम्हालाही मर्यादा सोडावी लागेल! भाजप नेत्याचा मनोज जरांगेंना इशारा
- शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढविणे शिवसैनिकांची जबाबदारी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











