Share

Manoj Jarange | मराठ्यांनी त्या श्रद्धेयांना खूप मोठं केलंय; मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा फडणवीसांचे कान टोचले

Manoj Jarange | जालना: राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा दिवसेंदिवस पेटत चालला आहे. याच पार्श्वभूमीवर आज मराठा आंदोलकांनी वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीची तोडफोड केली आहे. यानंतर गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे यांच्या अटकेची मागणी केली आहे. त्यांच्या या मागणीवर मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्याचबरोबर यावेळी बोलत असताना मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस … Read more

Published On: 

Manoj Jarange | जालना: राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा दिवसेंदिवस पेटत चालला आहे. याच पार्श्वभूमीवर आज मराठा आंदोलकांनी वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीची तोडफोड केली आहे.

यानंतर गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे यांच्या अटकेची मागणी केली आहे. त्यांच्या या मागणीवर मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्याचबरोबर यावेळी बोलत असताना मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर नाव न घेता टीका केली असल्याचं बोललं जात आहे.

Manoj Jarange commented on Maratha Reservation

प्रसार माध्यमांशी बातचीत करत असताना मनोज जरांगे (Manoj Jarange) म्हणाले, “सध्या हजारो गावांमध्ये मराठा समाजाचं आंदोलन सुरू आहे.

मराठा समाजाचं हे आंदोलन शांततेत सुरू आहे. मराठा समाज कधीच वेगळ्या पद्धतीने आंदोलन करणार नाही. गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीची तोडफोड कोणी केली? याबद्दल अजून मला काही माहित नाही. परंतु, या प्रकरणाचं समर्थन आम्ही करत नाही.”

Manoj Jarange commented on Devendra Fadnavis

यावेळी बोलत असताना मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी नाव न घेता देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पुन्हा एकदा धारेवर धरलं असल्याचं बोललं जात आहे.

ते म्हणाले, “आम्ही त्यांचे अत्यंत लाड केले आहे. मराठ्यांनी तब्बल 70 वर्ष त्यांची लाड केले आहे. त्यांनी त्यांचे मुलं-बाळ मोठे केले आहे. परंतु, त्यांना आमच्या मुला-बाळांशी काही घेणं देणं नाही.

आमचे मुलं मोठी होऊ नये, यासाठी ते चारी बाजूने प्रयत्न करत आहे. परंतु, शांततेच्या मार्गाने आंदोलन करून आम्ही त्यांचे सर्व प्रयत्न उधळून लावणार आहोत.

कोण श्रद्धेय मराठा समाजाला आरक्षण मिळू देत नाही? हे सर्वांना माहीत आहे. मराठ्यांनी त्या श्रद्धेयांना खूप मोठं केलेलं आहे. ती लोक सध्या विमानाने फिरत आहेत.

मराठा समाज रात्रंदिवस कष्ट करून आपल्या मुलांना शिकवत आहे. मात्र, ती लोकं आरामात जगत आहे. ते मराठ्यांना मोठं होऊ देत नाही. त्यांना जर आम्हाला आरक्षण द्यायचं नव्हतच, तर त्यांनी आमच्याकडून चाळीस दिवसांची मुदत का घेतली?”

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही