Share

Sanjay Raut | मराठा तरुण आत्महत्या करताय आणि सरकार जाहिरातीवर पैसे खर्च करतयं – संजय राऊत

Sanjay Raut | मुंबई: मराठा समाज आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यभर आंदोलन करताना दिसत आहे. मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे. राज्य सरकारला मराठा आरक्षणावर निर्णय घेण्यासाठी मनोज जरांगे यांनी 40 दिवसांची मुदत दिली होती. 24 ऑक्टोबरला हा कालावधी संपणार आहे. परंतु, सरकारने मराठा आरक्षणाबाबत अजून कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही. याच पार्श्वभूमीवर … Read more

Published On: 

Sanjay Raut | मुंबई: मराठा समाज आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यभर आंदोलन करताना दिसत आहे. मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे.

राज्य सरकारला मराठा आरक्षणावर निर्णय घेण्यासाठी मनोज जरांगे यांनी 40 दिवसांची मुदत दिली होती. 24 ऑक्टोबरला हा कालावधी संपणार आहे. परंतु, सरकारने मराठा आरक्षणाबाबत अजून कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही.

याच पार्श्वभूमीवर राज्यात मराठा तरुण आत्महत्या करताना दिसत आहे. या मुद्द्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर खोचक टीका केली आहे.

मराठा तरुण आत्महत्या करत आहे आणि राज्य सरकार जाहिरातींवर पैसा खर्च करताना दिसत आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

Does the state government want to give reservation to Maratha community or not? – Sanjay Raut

आज सकाळी प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना संजय राऊत म्हणाले, “राज्य शासनाला मराठा समाजाला आरक्षण द्यायचं आहे की नाही? हे स्वतःला मराठा समजणाऱ्या एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी समोर येऊन सांगायला पाहिजे.

मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी आज राज्यात तिसरी आत्महत्या झाली आहे. मराठा आरक्षणावर निर्णय घेण्यासाठी मनोज जरांगे यांनी राज्य शासनाला 40 दिवसांचा कालावधी दिला होता.

ही मुदत लवकरच संपत आहे. या एक महिन्यात सरकारने मराठा आरक्षणाबाबत काही निर्णय घ्यावे, असं सर्वांना वाटत होतं. परंतु, या एका महिन्यामध्ये तीन मराठा गरिबांनी आत्महत्या केली आहे. त्यांच्या या आत्महत्येनंतर सरकारच्या डोळ्याची पापणी देखील हलली नाही”

पुढे बोलताना ते म्हणाले, “सध्याचे राज्यकर्ते मराठा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मराठा म्हणून मुख्यमंत्रीपदावर बसवलं आहे. मराठ्यांचा चेहरा म्हणून एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केलं आहे. मात्र, ते काय करत आहे?

मराठ्यांना आरक्षण मिळालं नाही तर आणखीन तरुण आत्महत्या करतील, अशी मला भीती वाटत आहे. एकीकडे मराठा समाज आत्महत्या करत आहे. तर दुसरीकडे राज्य शासन जाहिरातींवर कोट्यावधी रुपये खर्च करत आहे.

आम्ही हे देऊ, आम्ही ते देऊ, आम्ही टिकाऊ आरक्षण दिलं, अशा प्रकारच्या जाहिराती सरकार करत आहे. मात्र, त्यांच्या या जाहिराती कुणी बघत नाही. त्यामुळे त्यांनी त्यांचे फोटो, आणि जाहिराती त्यांच्या जवळच ठेवाव्या.”

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install