🕒 1 min read
Virat Kohli- किंग कोहली मैदानात बॅटने आग ओकतो हे तर जगजाहीर आहे, पण सोशल मीडियावर मात्र तो गेल्या काही काळापासून ‘सायलेंट’ होता. आता मात्र असं काही घडलंय की, चाहत्यांना डोळ्यांवर विश्वास ठेवणं कठीण झालंय! नेमकं काय झालंय असं?
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात ११ जानेवारीपासून एकदिवसीय (ODI) मालिकेचा थरार रंगणार आहे. या मालिकेसाठी अवघे काही तास उरले असतानाच, विराट कोहलीने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या काही फोटोंनी इंटरनेटवर खळबळ उडवून दिली आहे. गंमत म्हणजे, गेल्या दोन वर्षांपासून विराटच्या सोशल मीडिया अकाउंटवर नजर टाकली, तर तिथे फक्त जाहिराती आणि ब्रँड प्रमोशनचाच पाऊस दिसायचा. ‘क्रिकेट’शी संबंधित किंवा सरावाचे फोटो टाकणं विराटने जवळपास बंदच केलं होतं. पण आता थेट नेट्समधील सरावाचे फोटो शेअर करत विराटने चाहत्यांना अनपेक्षित सुखद धक्का दिलाय.
Virat Kohli Instagram Post
विराटचा हा ‘अवतार’ पाहून चाहत्यांना हायसं वाटलंय. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या नुकत्याच पार पडलेल्या मालिकेत विराटने अक्षरशः धुमाकूळ घातला होता. मालिकावीर ठरलेल्या विराटने पहिल्या दोन सामन्यांत खणखणीत शतकं ठोकली होती, तर तिसऱ्या सामन्यात नाबाद ६५ धावा कुटल्या होत्या. इतकंच नाही तर, त्याआधी ऑस्ट्रेलियाविरुद्धही त्याने ७४ धावांची खेळी केली होती. म्हणजेच काय, तर विराटचा बॅटमधून रन्सचा पाऊस पडतोय आणि आता न्यूझीलंडच्या गोलंदाजांची काही खैर नाही, असाच संदेश जणू त्याने (Virat Kohli) या फोटोंमधून दिलाय.
बडोद्यात चाहत्यांचा महापूर शुबमन गिलच्या (Shubman Gill) नेतृत्वाखाली टीम इंडिया बडोद्यात दाखल झाली आहे. विराट बडोद्यात पोहोचताच विमानतळावर त्याच्या स्वागतासाठी चाहत्यांची एकच झुंबड उडाली होती. विराटसोबतच यशस्वी जैस्वाल, केएल राहुल (KL Rahul) आणि हर्षित राणा यांनीही मैदानावर जोरदार घाम गाळला आहे. आता सोशल मीडियावर कमबॅक केलेला ‘किंग कोहली’ ११ जानेवारीला बॅटने काय जादू दाखवतो, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.
📌 महत्वाच्या बातम्या
- “टांगा पलटी, घोडे फरार..!”; गणेश नाईकांचा एकनाथ शिंदेंना ‘अल्टिमेटम’; नवी मुंबईत महायुतीतच ‘महायुद्ध’!
- पार्थ पवारांच्या अडचणी वाढणार? फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट, म्हणाले – “तो १०० टक्के घोटाळाच!”
- ऑनलाइन जेवण मागवताय? सावधान! ‘या’ अभिनेत्रीसोबत जे घडलं ते तुमच्यासोबतही होऊ शकतं!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now









