Share

३३० धावांचा पाऊस की गोलंदाजांची दहशत? वडोदऱ्याच्या पिचवर काय घडणार? वाचा ‘इनसाईड’ रिपोर्ट

वडोदऱ्यात होणाऱ्या पहिल्या वनडेत ३२०-३३० धावांचा टप्पा गाठला जाण्याची शक्यता आहे. खेळपट्टी बॅटिंगला पोषक असली तरी गोलंदाजांसाठीही यात काही ‘ट्रिक्स’ लपलेल्या आहेत.

Published On: 

New Zealand Playing 11 vs India | Shubman Gill | ind vs nz

🕒 1 min read

IND vs NZ – क्रिकेटच्या मैदानात १-१ धावेसाठी संघर्ष पाहायला मिळतो, पण जर खेळपट्टीच ‘रन मशीन’ असेल तर? भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या वनडेसाठी वडोदरा सज्ज झालंय. विशेष म्हणजे, बीसीए स्टेडियमवर होणारा हा पहिलाच आंतरराष्ट्रीय पुरुष सामना आहे. त्यामुळे खेळपट्टी कशी असेल, यावर सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. ११ जानेवारीला होणाऱ्या या सामन्यात पाऊस पडणार का? आणि टॉस जिंकणारा कॅप्टन काय निर्णय घेणार? याचा हा खास रिपोर्ट.

IND vs NZ Pitch Report

सामन्यावर पावसाचं अजिबात सावट नाही. तापमान २८ अंश सेल्सिअसच्या आसपास राहील, त्यामुळे चाहत्यांना पूर्ण १०० षटकांचा थरार अनुभवायला मिळेल. वडोदऱ्याची खेळपट्टी ही बॅटिंगसाठी नंदनवन मानली जाते. चेंडू बॅटवर सुसाट येईल, त्यामुळे चौकार-षटकारांची आतषबाजी नक्कीच दिसेल. पण थांबा… गोलंदाजांनी निराश होण्याचं कारण नाही. सुरुवातीच्या एका तासात वेगवान गोलंदाजांना चांगला स्विंग मिळेल. जर टप्पा अचूक असेल, तर स्लिपमध्ये कॅचेस मिळण्याची दाट शक्यता आहे.

पण मॅच जसजशी पुढे जाईल, तसं गोलंदाजांना ‘प्लॅन बी’ वापरावा लागेल. ३४ षटकांनंतर चेंडू जुना झाल्यावर रिव्हर्स स्विंग मोठी भूमिका बजावेल. इनपुट्सनुसार, पहिल्या डावात कोरड्या परिस्थितीचा फायदा घेण्यासाठी फिरकीपटू महत्त्वाची भूमिका बजावतील.

टॉस जिंकून काय करावं?

दुसऱ्या डावात दवाचा (Dew) फॅक्टर महत्त्वाचा ठरू शकतो. ओल्या चेंडूने गोलंदाजी करणं कठीण जातं, हे आपण अनेकदा पाहिलंय. त्यामुळे जो संघ टॉस जिंकेल, तो डोळे झाकून पहिली गोलंदाजी घेण्याची शक्यता जास्त आहे. पहिल्यांदा बॅटिंग करणाऱ्या संघाला किमान ३२० ते ३३० धावा बोर्डावर लावाव्या लागतील, तरच सामना जिंकणं सोपं होईल.

थोडक्यात काय, तर वडोदऱ्यात रविवारी धावांचा पाऊस पडणार हे जवळपास नक्की आहे, पण जो संघ परिस्थितीनुसार गियर बदलेल, तोच बाजी मारेल!

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या