🕒 1 min read
मुंबई-ठाणे प्रवास म्हणजे डोकं सुन्न करणारा अनुभव! ट्रॅफिकच्या या चक्रव्यूहात फक्त सामान्य माणूसच नाही, तर बडे सेलेब्रिटीही अडकलेत. याचाच प्रत्यय नुकताच आला, जेव्हा मराठमोळी अभिनेत्री तेजश्री प्रधान (Tejashree Pradhan) हिने थेट देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासमोर मुंबईकरांच्या मनातील जळजळीत प्रश्न मांडला. ट्रॅफिकला कंटाळून तेजश्रीने चक्क आपलं राहतं घर बदलल्याचा खुलासा यावेळी केला.
‘होणार सून मी या घरची’ फेम तेजश्री सध्या ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेत व्यस्त आहे. या मालिकेचा सेट ठाण्यात आहे. पण फक्त शूटिंग हेच कारण नाही, तर प्रवासात होणारी दमछाक टाळण्यासाठी तिने गोरेगावमधील घर सोडून ठाण्यात शिफ्ट होण्याचा निर्णय घेतला. ती म्हणाली, “गोरेगाववरून ठाण्यात येताना ३ ते ४ तास वाया जातात. ट्रॅफिकमध्ये अडकल्याने खूप मनस्ताप होतो.” वेळ वाचवण्यासाठी आणि कामावर लक्ष केंद्रित करण्यासाठी तिने हा मोठा निर्णय घेतला.
Tejashree Pradhan questions Devendra Fadnavis
तेजश्रीने संधी साधत थेट देवेंद्र फडणवीस यांना विचारले, “ठाण्यातील या वाहतूक कोंडीवर सरकारकडे काही प्लॅनिंग आहे का?” यावर फडणवीसांनीही समस्येचे गांभीर्य मान्य केले. ते म्हणाले, “ठाणे आणि MMR क्षेत्रातील ट्रॅफिकची समस्या गंभीर आहे, हे आम्हाला ठाऊक आहे.”
या समस्येवर उपाय म्हणून फडणवीसांनी मेट्रो आणि इन्फ्रास्ट्रक्चरचा दाखला दिला. “मेट्रोमुळे रस्त्यावरील वाहनांचा भार नक्कीच कमी होईल. तसेच आगामी काळात रस्ते रुंदीकरण आणि नवीन फ्लायओव्हर्समुळे ठाणेकरांचा प्रवास सुखकर होईल,” असे आश्वासन त्यांनी दिले. तेजश्रीचा हा प्रश्न आणि फडणवीसांचे उत्तर सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- ॲशेस गाजवल्यावर मिशेल स्टार्क घेणार निवृत्ती? ‘त्या’ एका निर्णयाने क्रिकेटविश्वात खळबळ; म्हणाला, “अजून तर…”
- निवड समितीला ‘सणसणीत’ चपराक! टीम इंडियातून डच्चू मिळताच ऋतुराजने फोडला रेकॉर्ड्सचा ‘बार’
- काँग्रेसला ‘जोर का झटका’! 11 नगरसेवकांचा अख्खा गटच भाजपात; अंबरनाथमध्ये ‘ऑपरेशन लोटस’?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now










