🕒 1 min read
छत्रपती संभाजीनगर: एकेकाळी ‘राष्ट्र प्रथम’चा नारा देणाऱ्या भाजपचा प्रवास आता ‘गुंड आणि बलात्कारी प्रथम’च्या दिशेने सुरू झालाय का? असा अस्वस्थ करणारा सवाल आता राजकीय वर्तुळात विचारला जातोय. निमित्त ठरलंय ते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजपच्या हिंदुत्वावर केलेला आतापर्यंतचा सर्वात बोचरा वार. पाण्याच्या प्रश्नावरून सरकारला धारेवर धरल्यानंतर ठाकरेंनी थेट भाजपच्या ‘चाल, चरित्र आणि चेहऱ्या’चा पंचनामा केला. “‘राष्ट्र प्रथम’ ते ‘भ्रष्टाचार प्रथम, बलात्कारी प्रथम’ असा भाजपचा प्रवास झालाय,” असा घणाघात त्यांनी केला.
ठाकरेंनी केवळ आरोप केले नाहीत, तर पुराव्यानिशी भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. बदलापूर प्रकरणाचा (Badlapur Case) दाखला देताना त्यांनी अत्यंत गंभीर दावा केला. “बदलापूरमधील चिमुकलीवर झालेल्या अत्याचारातील मुख्य आरोपीचा ‘एन्काऊंटर’ करून प्रकरण दाबले गेले. मात्र, याच प्रकरणातील तुषार आपटे नावाचा सह-आरोपी, जो कथितपणे ‘संघाचा कार्यकर्ता’ असल्याची चर्चा होती, त्याला भाजपने चक्क स्वीकृत नगरसेवक पद देऊन सन्मानित केले,” असा खळबळजनक आरोप ठाकरेंनी भरसभेत केला.
“साधूंच्या मारेकऱ्याला पक्षात प्रवेश?”
पालघर साधू हत्याकांडावरून (Palghar Sadhu Lynching) तेव्हा उद्धव ठाकरेंच्या सरकारला हिंदुत्वविरोधी ठरवणाऱ्या भाजपला ठाकरेंनी आरसा दाखवला. “तेव्हा आम्ही दोषी होतो, मग आता काय झालं? ज्याने साधूंवर हात उचलला, त्याच आरोपीला भाजपने पक्षात प्रवेश दिला,” असा गौप्यस्फोट करत ठाकरेंनी भाजपच्या नैतिकतेचे वाभाडे काढले. राजकीय फायद्यासाठी भाजप कोणालाही पावन करून घेते, हेच त्यांचं बदललेलं हिंदुत्व आहे का, असा सवाल आता उपस्थित होतोय.
📌 महत्वाच्या बातम्या
- Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींची संक्रांत होणार गोड? खात्यात थेट ३००० रुपये ‘या’ तारखेला जमा होण्याची शक्यता!
- तेजश्री प्रधाननंतर आता ‘नॅशनल क्रश’ घेणार मुख्यमंत्र्यांची ‘शाळा’; पुण्यात होणाऱ्या ‘त्या’ मुलाखतीची जोरदार चर्चा!
- “पुरावे बैलगाडीभर आणि कृती शून्य? फडणवीस ‘दुतोंडी गांडुळासारखे’…”; ठाकरेंचा सर्वात विखारी हल्ला!












