Share

“पुरावे बैलगाडीभर आणि कृती शून्य? फडणवीस ‘दुतोंडी गांडुळासारखे’…”; ठाकरेंचा सर्वात विखारी हल्ला!

“७० हजार कोटींचे पुरावे खोटे की तुम्ही दुतोंडी गांडूळ?” उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांवर अत्यंत विखारी टीका केली आहे. बदलापूर प्रकरणावरूनही त्यांनी भाजपला घेरले.

Published On: 

devendra fadnavis, Uddhav Thackeray

छत्रपती संभाजीनगर: राजकारणात सत्तेसाठी माणसं किती रंग बदलू शकतात, याचं उत्तम उदाहरण म्हणजे सध्याचं सरकार! असा घणाघात करत उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) आज थेट देवेंद्र फडणवीसांच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. “जे फडणवीस ७० हजार कोटींच्या घोटाळ्याचे पुरावे बैलगाडीभरून आणायच्या वल्गना करायचे, त्यांनीच आज त्या घोटाळेबाजांना मांडीवर बसवलंय. एकतर तुमचे ते पुरावे खोटे होते किंवा तुम्ही सत्तेसाठी ‘दुतोंडी गांडुळासारखे’ वागत आहात,” अशा अत्यंत तिखट शब्दांत ठाकरेंनी फडणवीसांवर (Devendra Fadnavis) प्रहार केला आहे.

‘देवाभाऊ’ नाही, हे तर ‘मेवाभाऊ’!

सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढताना ठाकरेंनी फडणवीसांचा उल्लेख पुन्हा एकदा ‘मेवाभाऊ’ असा केला. ते म्हणाले, “संभाजीनगरमध्ये वर्षातील ३६५ दिवसांपैकी लोकांना जेमतेम ४४ दिवस पाणी मिळतं. पण हे सरकार पाणी योजना पूर्ण करण्याऐवजी दारूचे परवाने वाटण्यात मग्न आहे.” मुंबई महापालिकेच्या ९२ हजार कोटींच्या ठेवी फोडून मुंबईकरांवर ३ लाख कोटींचं कर्ज लादल्याचा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला.

बदलापूर ते पालघर: हेच का तुमचे हिंदुत्व?

भाजपच्या ‘वॉशिंग मशीन’ राजकारणावर बोलताना ठाकरे आक्रमक झाले. “बदलापूरमधील चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाचा साथीदार तुषार आपटे याला तुम्ही नगरसेवक करता? पालघरमधील साधू हत्याकांडातील आरोपीला पक्षात घेता? हा भाजप आता ‘राष्ट्र प्रथम’ नाही, तर ‘गुंड आणि बलात्कारी प्रथम’ झालाय,”. हे हिंदुत्व नसून ‘विकृती’ असल्याचं त्यांनी ठणकावून सांगितलं.

“फोन-पे वरून पैसे वाटताय?”

निवडणुकीत पराभव दिसू लागल्याने हे लोक आता ‘फोन-पे’ (PhonePe) द्वारे मतदारांना पैसे वाटत आहेत. पण ही ‘पैशाची मस्ती’ फार काळ टिकणार नाही. तुम्ही आमचा पक्ष चोरला, चिन्ह चोरलं, आता कोस्टल रोडसारख्या कामांचे श्रेयही चोरायला निघालात? पण जनता दूधखुळी नाही, ती तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही ठाकरेंनी दिला.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही